केंद्रीय शाळांमध्ये हिंदी-संस्कृतमधून प्रार्थना का?, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 03:08 PM2018-01-10T15:08:16+5:302018-01-10T15:35:01+5:30
देशातील एक हजारहून अधिक केंद्रीय शाळांमध्ये सकाळच्या वेळेस विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणा-या प्रार्थनेद्वारे एखाद्या धर्माचा प्रचार होत आहे का ?, अशी विचारणा सुप्रीम कोर्टानं केली आहे.
नवी दिल्ली - देशातील एक हजारहून अधिक केंद्रीय शाळांमध्ये सकाळच्या वेळेस विद्यार्थ्यांकडून शिकवण्यात येणा-या प्रार्थनेद्वारे एखाद्या धर्माचा प्रचार होत आहे का ?, अशी विचारणा सुप्रीम कोर्टानं केली आहे. यावरुन केंद्रीय शाळांमध्ये सकाळी होणा-या हिंदी-संस्कृतमधील प्रार्थनांवरुन वाद निर्माण झाला आहे.
यासंबंधित दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं हा प्रश्न उपस्थित केला आहे. हा घटनात्मक मुद्दा असल्याचं सांगत, सुप्रीम कोर्टानं यावर विचार करणं गरजेचं असल्याचे मत व्यक्त केले आहे. कोर्टानं याप्रकरणी केंद्र सरकारला नोटीस बजावून स्पष्टीकरणदेखील द्यायला सांगितले आहे.
'केंद्रीय शाळांमध्ये 1964 सालापासून हिंदी-संस्कृत भाषेमध्ये सकाळी प्रार्थना म्हटली जात आहे. मात्र ही बाब पूर्णतः घटनाबाह्य असल्याचं सांगत यासंदर्भात एका वकिलानं याचिका दाखल केली आहे. या वकिलानं असेही सांगितले की, सरकारी शाळांमध्ये धार्मिक श्रद्धा व त्यासंबंधित ज्ञान प्रसारित करण्याऐवजी वैज्ञानिक तथ्यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.
हिंदी-संस्कृत भाषांमध्ये म्हटल्या जाणा-या प्रार्थनांमुळे कोणत्याही धार्मिक श्रद्धेला प्रोत्साहन दिले जात आहे का?, अशी विचारणा करत कोर्टानं केंद्र सरकार आणि केंद्रीय विद्यालय संघटनांना नोटीस बजावली आहे. शाळांमध्ये सर्वधर्मियांची प्रार्थना का म्हटली जात नाही?,असा प्रश्नदेखील कोर्टानं विचारला आहे. शिवाय जारी करण्यात आलेल्या नोटीसला 4 आठवड्यांमध्ये स्पष्टीकरण द्यायले सांगितले आहे.
केंद्रीय शाळांमध्ये सकाळी म्हटल्या जाणा-या प्रार्थना
असतो मा सद्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मामृतं गमय
दया कर दान विद्या का हमें परमात्मा देना
दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना
हमारे ध्यान में आओ प्रभु आंखों में बस जाओ
अंधेरे दिल में आकर के प्रभु ज्योति जगा देना
बहा दो प्रेम की गंगा दिलों में प्रेम का सागर
हमें आपस में मिल-जुल कर प्रभु रहना सिखा देना
हमारा धर्म हो सेवा हमारा कर्म हो सेवा
सदा ईमान हो सेवा व सेवक जन बना देना
वतन के वास्ते जीना वतन के वास्ते मरना
वतन पर जां फिदा करना प्रभु हमको सिखा देना
दया कर दान विद्या का हमें परमात्मा देना
ओ३म् सहनाववतु
सहनै भुनक्तु
सहवीर्यं करवावहै
तेजस्विनामवधीतमस्तु
मा विद्विषावहै
ओ३म् शान्तिः शान्तिः शान्तिः