अमिताभ बच्चन यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
By admin | Published: May 11, 2016 12:19 PM2016-05-11T12:19:39+5:302016-05-11T13:11:41+5:30
बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात 2001मध्ये कर प्रकरण थकवल्याप्रकरणी पुन्हा नव्याने खटला सुरु करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आयकर विभागाला परवानगी दिली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 11 - बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात 2001मध्ये कर थकवल्याप्रकरणीचा खटला पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आयकर विभागाला परवानगी दिली आहे. यामुळे अमिताभ बच्चन यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अमिताभ बच्चन यांनी 2001 -2002मध्ये 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमातून कोट्यावधी रुपये कमावले. मात्र त्या कमाईवरील देय असलेले 1.66 कोटींचा कर थकवल्याचा आरोप आयकर विभागाने केला होता. जुलै 2012 मध्ये आयकर विभागाच्या आयुक्तांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाऴली होती. त्यानंतर आयकर विभागाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने आयकर विभागाला बच्चन यांची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे.