सुप्रीम कोर्टात घडला विनोदी किस्सा; फोनची रिंगटोन वाजली अन् न्यायाधीशांच्या ‘त्या’ विधानानं हशा पिकला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 12:48 PM2021-07-29T12:48:55+5:302021-07-29T12:49:32+5:30
कोर्टात आत्महत्या आणि पीडिताने लिहिलेली सुसाईड नोटवर यावर सुनावणी सुरू होती.
नवी दिल्ली – कोर्ट म्हटलं तर भलेभले त्याठिकाणी गप्प बसतात. कोर्टाचा अवमान होईल असं कृत्य कुणीही करणार नाही. कडक शिस्त अशी प्रतिमा असणाऱ्या सुप्रीम कोर्टात गुरुवारी विनोदी किस्सा घडला जो ऐकून तुम्हालाही हसू येईल. न्या. अब्दुल नजीर यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती. तेव्हा वारंवार एका वकिलाचा फोन वाजत होता. तेव्हा न्यायाधीशांनी या वकिलाची गमंत केली.
कोर्टात आत्महत्या आणि पीडिताने लिहिलेली सुसाईड नोटवर यावर सुनावणी सुरू होती. वकील कोर्टासमोर त्यांची बाजू मांडत होते. ते म्हणत होते की, आत्महत्येमागे प्रेमाचा अँगल आहे परंतु अद्याप त्याचे कुठलेही पुरावे नाहीत यापुढे बोलणारच इतक्यात वकिलाचा मोबाईल फोन वाजला. कोर्टाच्या बातम्या देणारी वेबसाईट बार एँन्ड बेंचनुसार, पहिल्यांदा दोनवेळा मोबाईल फोनची रिंगटोन वाजली. त्यावर जस्टीस नजीर यांनी विनोदी शैलीत म्हटलं की ही खरचं लव्ह स्टोरी आणि बँकग्राऊंडला म्यूजिक ऐकायला मिळत आहे.
त्यावर वकील क्षणभर विचलित झाले. त्यानंतर मला माफ करा, काही बकवास फोन कोल्स होते, याठिकाणी प्रेमाचा अँगल पाहण्यासाठी कुठलाही पुरावा नाही. तेव्हा जस्टिस नजीर म्हणाले की, सुसाईड नोट पाहा कशी लिहिली आहे? एखाद्या वकिलाने लिहिल्यासारखं दिसून येत आहे. पूर्णपणे प्रोफेशनल असं ते म्हणाले.