अपंगत्वाच्या आधारावर MBBS मध्ये प्रवेश रोखता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 03:17 PM2024-10-15T15:17:22+5:302024-10-15T15:17:47+5:30
Supreme Court On MBBS Admissions : विद्यार्थी अभ्यासात सक्षम असेल तर त्याला अपंगत्वाच्या आधारे एमबीबीएसमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखता येणार नाही.
Supreme Court On MBBS Admissions : सर्वोच्च न्यायालयाने MBBS मध्ये दिव्यांग विद्यार्थ्याला प्रवेश देण्याबाबत एक मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, 'दिव्यांग व्यक्ती एखादी भाषा बोलण्यास किंवा समजण्यास असमर्थ असेल, तर त्याला MBBS मध्ये प्रवेश नाकारता येत नाही. वैद्यकीय मंडळाने तो विद्यार्थी अभ्यास करण्यास सक्षम असल्याचे सांगितल्यानंतरच त्याला प्रवेश घेण्यापासून रोखावे.' सुमारे 45 टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्याला वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याच्या प्रकरणावर न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.
Benchmark disability no grounds for denying admission to MBBS courses: Supreme Court
— ANI Digital (@ani_digital) October 15, 2024
Read @ANI Story | https://t.co/49jwFsmdwu#Disability#MBBS#admission#medicalcoursespic.twitter.com/VGVFAqGQBJ
दरम्यान, नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या नियमांनुसार 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्यास एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळू शकत नाही. पण, आता न्यायमूर्ती बीआर गवई, अरविंद कुमार आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा नियम बदलण्याची गरज व्यक्त केली आहे. अपंग विद्यार्थ्यांचे प्रकरण अपंगत्व मूल्यमापन मंडळाकडे सोपवावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. अपंगत्वामुळे विद्यार्थ्याला अभ्यास पूर्ण करता येत नाही, असे बोर्डाचे म्हणणे असेल, तरच त्याला प्रवेश नाकारता येईल.
याआधी 18 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालयात 45 टक्के भाषा बोलण्यास आणि समजण्यास असमर्थ असलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. या याचिकेत याचिकाकर्त्याने म्हटले होते की, त्याला 44-45% भाषेचे अपंगत्व असल्याने त्याची प्रवेशिका रद्द करण्यात आली आहे. त्याच्यात दुसरा कोणताही कमकुवतपणा नाही. तो आपले शिक्षण पूर्ण करू शकतो. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने विद्यार्थ्याला अभ्यासासाठी योग्य असल्याचे घोषित केले आणि त्याला प्रवेश देण्याचे आदेश महाविद्यालयाला दिले. आज न्यायालयाने याच प्रकरणी सविस्तर आदेश जारी केला आहे.