अर्णब गोस्वामी यांची याचिका सुनावणीला घेण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 04:18 AM2020-12-08T04:18:48+5:302020-12-08T07:47:06+5:30

Arnab Goswami News : महाराष्ट्रातील पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांत कोणालाही अटक करण्यात येऊ नये व या प्रकरणांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी याचिकेत केलेली विनंती फारच महत्त्वाकांक्षी आहे.

Supreme Court refuses to hear Arnab Goswami's plea | अर्णब गोस्वामी यांची याचिका सुनावणीला घेण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार

अर्णब गोस्वामी यांची याचिका सुनावणीला घेण्यास सुप्रिम कोर्टाचा नकार

Next

नवी दिल्ली : रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकारांविरोधात मुंबई पोलिसांनी एकाप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरविरोधात या वृत्तवाहिनीची संचालक कंपनी एआरजी आऊटलियर मीडिया प्रा. लि. व अर्णब गोस्वामी यांनी केलेली रिट याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस घेण्यास सोमवारी नकार दिला. ही याचिका महत्त्वाकांक्षी हेतूने केली असल्याचेही न्यायालयाने म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड व न्या.  इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने सांगितले की, महाराष्ट्रातील पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांत कोणालाही अटक करण्यात येऊ नये व या प्रकरणांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी याचिकेत केलेली विनंती फारच महत्त्वाकांक्षी आहे.  टीआरपी घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यात रिपब्लिक टीव्हीसह तीन वाहिन्या सहभागी असल्याचा दावा मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांनी केला होता. 

वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनाला सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.

याचिका मागे घेण्यास दिली परवानगी
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, अर्णब गोस्वामी व रिपब्लिक टीव्हीच्या संचालक कंपनीने त्यांची याचिका मागे घ्यावी. याचिका मागे घेण्यासाठी न्यायालयाने याचिकादारांना परवानगीही दिली.

Web Title: Supreme Court refuses to hear Arnab Goswami's plea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.