'पद्मावती'च्या वादात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 05:45 PM2017-11-20T17:45:59+5:302017-11-20T17:51:26+5:30
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित पद्मावती सिनेमाचा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता पद्मावती सिनेमा प्रदर्शित करण्याच्या वादात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने सुद्धा नकार दिला आहे.
नवी दिल्ली : दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या बहुचर्चित पद्मावती सिनेमाचा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता पद्मावती सिनेमा प्रदर्शित करण्याच्या वादात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने सुद्धा नकार दिला आहे.
पद्मावती सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी आज झाली. यावेळी सेन्सॉर बोर्डच्या कामात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार देत याचिका फेटाळून दिली आहे. पद्मावती सिनेमाबाबत सेन्सॉर बोर्ड काम करत आहे, त्यामुळे याप्रकरणात सुप्रीम कोर्ट कशाप्रकारे लक्ष घालेल, असा सवाल सुद्धा यावेळी केला.
Supreme Court refuses to interfere in the matter of film #Padmavati's release. The court was hearing a plea filed by a lawyer and stated, 'we cannot interfere with CBFC's work' pic.twitter.com/vH6N3iUErd
— ANI (@ANI) November 20, 2017
दरम्यान, पद्मावती या सिनेमाला मध्य प्रदेशात बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतला आहे. यामुळे दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या संजय लीला भन्साळींच्या या सिनेमाला चांगलीच झळ बसणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, राजपूत समाजाने केलेल्या जोरदार विरोधामुळे आधीच संजय लीला भन्साळी यांनी पद्मावतीचे प्रदर्शन लांबणीवर टाकल्याचे जाहीर केले आहे.
राजपूत समाजाच्या नेत्यांनी शिवराज सिंह यांच्याकडे आपली बाजू मांडली. हा चित्रपट राजपूत समाजाचा अपमान करत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. या समाजाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मध्य प्रदेशात पद्मावती दाखवण्यात येणार नाही असे चौहान यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.
Vivaad ki jagah vichaar-vimarsh ki aavshyakta hai: Prasoon Joshi, Central Board of Film Certification (CBFC) chairperson #Padmavatipic.twitter.com/7Hu6QlFnep
— ANI (@ANI) November 20, 2017
हा सिनेमा आधी 1 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार होता. परंतु चित्रपटावरून झालेल्या वादामुळे प्रदर्शनाची तारीख अनिश्चितरीत्या पुढे ढकलण्यात आल्याचे निर्मात्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, सेन्सॉर बोर्डाला हा चित्रपट दाखवण्याआधी विविध प्रसारमाध्यमांना हा चित्रपट दाखवण्यात आला यावर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी टीका केली आहे. तसेच, अर्जात त्रुटी असल्याचे दाखवत सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवला आहे. याबरोबर, पद्मावती सिनेमाच्या वादावर चर्चा करण्याची गरज असल्याचे सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी म्हटले आहे.
बाजीराव मस्तानीच्या यशानंतर पद्मावती या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची घोषणा भन्साळी यांनी केली. रणबीर सिंह व दीपिका पदुकोण या यशस्वी जोडीसह शाहिद कपूरला स्थान दिले. मात्र, अल्लाउद्दिन खिलजीसोबत कथित स्वप्नातील प्रणयदृष्ये असल्याची व अन्य आक्षेपार्ह दृष्ये असल्याची टीका विरोधकांनी केली. तसेच या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा व राजपूत समाजाची बदनामी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.