Anil Deshmukh: अनिल देशमुखांना मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या; सगळे पर्याय संपले?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 05:09 PM2021-08-16T17:09:43+5:302021-08-16T17:12:02+5:30

Anil Deshmukh: सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्या आहेत.

supreme court refuses interim protection to former maharashtra home minister anil deshmukh in PMLA case | Anil Deshmukh: अनिल देशमुखांना मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या; सगळे पर्याय संपले?

Anil Deshmukh: अनिल देशमुखांना मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या; सगळे पर्याय संपले?

Next
ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुखांच्या याचिका फेटाळून लावल्याअनिल देशमुख यांना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकारअनिल देशमुखांचा शेवटचा पर्यायही बंद झाला?

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉंड्रिंग तसेच १०० कोटींच्या वसुली प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अनेकदा नोटीस बजावली आहे. मात्र, नोटीस बजावूनही अनिल देशमुख यांनी काही कारणे देत प्रत्यक्ष चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. या पार्श्वभूमीवर ईडीने कारवाई करू नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. काही याचिकांच्या माध्यमातून काही मागण्या केल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सर्व मागण्या फेटाळून लावल्या आहेत. (supreme court refuses interim protection to former maharashtra home minister anil deshmukh in PMLA case)

सेनेला शह देणार! नारायण राणेंवर ‘मिशन ११४’ ची जबाबदारी? BMC निवडणुकीसाठी BJP ची तयारी

सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुखांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्या. ए. एम. खानविलकर, न्या. कृष्णा मुरारी आणि न्या. व्ही रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. ज्येष्ठ विधीज्ञ विक्रम चौधरी यांनी अनिल देशमुख यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. 

“महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या, तरी ठाकरे सरकारची तक्रार आहेच”; भारती पवारांचे टीकास्त्र

सर्वोच्च न्यायालयाने मागण्या फेटाळल्या

अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत प्रामुख्याने तपासाला स्थगिती द्यावी, ईडीकडून पाठवण्यात आलेले समन्स रद्द करावे , अटकेसारखी गंभीर कारवाई करण्यास मज्जाव करावी, अशा मागण्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या मागण्या करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. याबाबत सीआरपीसीच्या अनुषंगाने याचिका करावी, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. यापूर्वी, सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील दोन पॅरेग्राफ रद्द करावेत, या मागणीसाठी ठाकरे सरकारने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे उच्च न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेल्या याचिका अनिल देशमुख यांच्यासाठी दणका मानला जात आहे. तसेच यानंतर आता अनिल देशमुखांचा शेवटचा पर्यायही बंद झाल्याचे सांगितले जात आहे. 

“विरोधकांच्या एकतेसाठी सोनिया गांधी यांचे प्रयत्न प्रशंसनीय, पण...”; कपिल सिब्बलांचे रोखठोक मत

दरम्यान, ईडीने अनिल देशमुख यांना अनेकदा नोटीस बजावत चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र, वय, आजार आणि कोरोनाची कारणे पुढे करत अनिल देशमुख यांनी ईडीसमोर प्रत्यक्ष चौकशीला उपस्थित राहण्यास स्पष्ट नकार दर्शवला होता. तसेच ईडी मनी लाँड्रिगप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये  चौकशीसाठी अनिल देशमुख व त्यांचे पुत्र ऋषिकेश यांना ईडी आणखी एकदा समन्स बजावण्याच्या तयारीत आहे. ईडीने देशमुख यांच्या नागपुरातील मालमत्तेवर छापे टाकून झडती घेतली. 
 

Web Title: supreme court refuses interim protection to former maharashtra home minister anil deshmukh in PMLA case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.