अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड'चे स्ट्रिमिंग OTT वर थांबवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 06:44 PM2022-05-19T18:44:01+5:302022-05-19T19:01:31+5:30

Jhund On OTT : न्या. एल नागेश्वर राव, बीआर गवई आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, 5 मेच्या आदेशानुसार चित्रपटाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Supreme Court refuses to stop streaming Amitabh Bachchan's 'Jhund' on OTT | अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड'चे स्ट्रिमिंग OTT वर थांबवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड'चे स्ट्रिमिंग OTT वर थांबवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

googlenewsNext

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी अमिताभ बच्चन स्टारर हिंदी चित्रपट 'झुंड'चे ओव्हर द टॉप (OTT) प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग रोखण्यास नकार दिला आहे. न्या. एल नागेश्वर राव, बीआर गवई आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, 5 मेच्या आदेशानुसार चित्रपटाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हैदराबादस्थित चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण याचिका तेलंगणा उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेत उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर लगेच कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप केला होता. झुंड चित्रपटाच्या हक्कांबाबत पक्षकारांमध्ये कनिष्ठ न्यायालयात एक समझोता डिक्री पारित करण्यात आली. प्रतिवादी क्रमांक 1 (नंदी) यांनी फसवणूक झाल्याच्या कारणास्तव डिक्रीला आव्हान दिले. त्यांनी एक याचिका देखील दाखल केली. उच्च न्यायालयासमोरील ती रिट याचिका फेटाळण्यात आली. ट्रायल कोर्टानेही सेटलमेंट डिक्री मागे घेण्याचा अर्ज फेटाळला. यापूर्वी, तेलंगणा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने  OTT वर चित्रपट प्रदर्शित करण्यास स्थगिती दिली होती. मात्र, ZEE5 वर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.


उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात चित्रपट निर्माता सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (टी सीरीज) च्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. यापूर्वी ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला हा चित्रपट ६ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. 29 एप्रिल रोजी, उच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. 'झुंड'च्या निर्मात्यांनी कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा आरोप करणाऱ्या कुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश देण्यात आला.
तत्पूर्वी, कुमार यांनी चित्रपटाच्या थिएटर रिलीजवर मनाई घालण्याची मागणी केली होती. चित्रपट निर्मात्यांविरूद्धच्या पूर्वीच्या खटल्यात सेटलमेंटच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता, तथापि, ट्रायल कोर्टाने सेटलमेंटसाठी परत बोलावण्याची विनंती नाकारली आणि चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यास परवानगी दिली. 

त्यानंतर, हा चित्रपट 4 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर कुमार यांनी उच्च न्यायालयात ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले आणि 29 एप्रिल रोजी अंतरिम आदेश पारित केला. स्लम सॉकर या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित 'झुंड' हा चरित्रात्मक क्रीडा चित्रपट आहे.

Web Title: Supreme Court refuses to stop streaming Amitabh Bachchan's 'Jhund' on OTT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.