मोदींच्या निवडीला आव्हान देणाऱ्या माजी सैनिक तेज बहादूर यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

By बाळकृष्ण परब | Published: November 24, 2020 05:03 PM2020-11-24T17:03:56+5:302020-11-24T17:05:11+5:30

Tej Bahadur News : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून झालेल्या निवडीला आव्हान देणारी याचिका बीएसएफमधून बरखास्त करण्यात आलेले जवान तेज बहादूर यांनी दाखल केली होती.

Supreme Court rejects an appeal filed by dismissed BSF constable, Tej Bahadur | मोदींच्या निवडीला आव्हान देणाऱ्या माजी सैनिक तेज बहादूर यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

मोदींच्या निवडीला आव्हान देणाऱ्या माजी सैनिक तेज बहादूर यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देमाजी सैनिक असलेल्या तेज बहादूर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होतावाराणसीमधील निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी गतवर्षी १ मे २०१९ रोजी तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज बाद केला होतात्याविरोधात तेज बहादूर यांनी न्यायालयीन लढाई सुरू केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवडीला आव्हान दिले होते.

नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून झालेल्या निवडीला आव्हान देणारी याचिका बीएसएफमधून बरखास्त करण्यात आलेले जवान तेज बहादूर यांनी दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देताना ही याचिका फेटाळून लावली आहे.

माजी सैनिक असलेल्या तेज बहादूर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र हा अर्ज बाद ठरवण्यात आला होता. त्याविरोधात तेज बहादूर यांनी न्यायालयीन लढाई सुरू केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवडीला आव्हान दिले होते. मात्र अलाहाबाद हायकोर्टात त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली होती.

त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. दरम्यान, तेज बहादूर यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यालायलाचे सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती एएस बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रह्मण्यम यांच्या पीठाने १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी पूर्ण केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानेही अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत तेज बहादूर यांची याचिका फेटाळून लावली.



या प्रकरणी तेज बहादूर यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले होते की, माझ्या अशिलाने आधी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र नंतर समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून नामांकन दाखल केले. हायकोर्टाने दिलेल्या निकालाचा उल्लेख करत त्यांनी म्हटले होते की, माझ्या अशिलाचा उमेदवारी अर्ज हा अन्य कारणांमुळे रद्द करण्यात आला होता.

वाराणसीमधील निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी गतवर्षी १ मे २०१९ रोजी तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज बाद केला होता. तसेच नामांकन पत्रासोबत त्यांना भ्रष्टाचार किंवा सरकारसोबत विश्वासघात केल्यामुळे सशस्त्र दलांमधून बरखास्त करण्यात आले नसल्याचे प्रमाणपत्र संलग्न नसल्याचे अर्ज फेटाळताना सांगितले.

तेज बहादूर यांना २०१७ मध्ये सीमा सुरक्षा दलांमधून बरखास्त करण्यात आले होते. सशस्त्र दलांच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याचा आरोप तेज बहादूर यांनी एक व्हिडिओ शेअर करून केला होता.

Web Title: Supreme Court rejects an appeal filed by dismissed BSF constable, Tej Bahadur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.