सोनियांविरोधात FIR दाखल करण्याचा आदेश देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
By admin | Published: July 15, 2016 01:43 PM2016-07-15T13:43:48+5:302016-07-15T13:43:48+5:30
अगुस्ता हॅलिकॉप्टर घोटाळयात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीं विरोधात सीबीआयला एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - अगुस्ता वेस्टलँड हॅलिकॉप्टर घोटाळयात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांच्या सहका-यांविरोधात सीबीआयला एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. अगुस्ता हॅलिकॉप्टर घोटाळयाची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. त्यामुळे एफआयआर दाखल करायचा कि, नाही ते सीबीआय ठरवले असे सर्वोच्च न्यायालायने सांगितले.
वकिल एमएल.शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. शर्मा यांनी आपल्या याचिकेत सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अहमद पटेल यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी केली होती.
इटालियन कोर्टाच्या आदेशात नाव येऊनही सीबीआय भारतातील हायप्रोफाईल राजकारण्यांवर कारवाई करत नसल्याचे शर्मा यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते. इटालियन कोर्टाच्या निकालावर विश्वास ठेवणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
सीबीआय या प्रकरणात जे पुरावे गोळा करेल त्या आधारावर ते एफआयआर संबंधी निर्णय घेतील असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. पुरावे असतानाही सीबीआय कारवाई करत नसेल तर, शर्मा पुन्हा न्यायालयात दाद मागू शकतात असे न्यायालयाने स्पष्ट केले.