इंदुरीकर महाराजांना धक्का! गुन्हा दाखल होण्याचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 03:15 PM2023-08-08T15:15:47+5:302023-08-08T15:16:25+5:30

Indurikar Maharaj in Supreme Court: कोणती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली? नेमके प्रकरण काय? जाणून घ्या...

supreme court rejects plea of indurikar maharaj against decision of aurangabad bench of mumbai high court | इंदुरीकर महाराजांना धक्का! गुन्हा दाखल होण्याचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

इंदुरीकर महाराजांना धक्का! गुन्हा दाखल होण्याचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

googlenewsNext

Indurikar Maharaj in Supreme Court: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एका कीर्तनात केलेल्या विधानावरून इंदुरीकर महाराजांवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाविरोधात इंदुरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. 

इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातून लिंगभेदावर भाष्य केले होते. इंदुरीकर महाराजांच्या मुलगा आणि मुलगी होण्याच्या विधानावरून एकच खळबळ उडाली होती. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या सुनावणीवेळी खंडपीठाने इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असे निर्देश दिले होते. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. 

इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा 

इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात याचिका करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सत्र न्यायालयाने हा आदेश रद्द केला होता. या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला होता. औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला इंदुरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पण, सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत इंदुरीकर यांची याचिका निकाली काढली आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी लिंगभेदाबाबत केलेले विधान PCPNDT कायद्याच्या कलाम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप करत त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवून खुलासा मागितला होता. 


 

Web Title: supreme court rejects plea of indurikar maharaj against decision of aurangabad bench of mumbai high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.