भगवान विष्णूंच्या फोटो प्रकरणी धोनीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

By admin | Published: September 5, 2016 04:51 PM2016-09-05T16:51:37+5:302016-09-05T16:51:37+5:30

एका मासिकाच्या मुखपृष्ठावर भगवान विष्णू रूपातील फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे अडचणीत सापडलेला भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिलासा मिळाला.

Supreme Court relief to Dhoni in connection with Lord Vishnu's photo | भगवान विष्णूंच्या फोटो प्रकरणी धोनीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

भगवान विष्णूंच्या फोटो प्रकरणी धोनीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - एका मासिकाच्या मुखपृष्ठावर भगवान विष्णू रूपातील फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे अडचणीत सापडलेला भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी धोनी विरोधातील गुन्हेगारी कारवाईची प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले. 
 
मासिकाच्या मुखपृष्ठावर धोनीचा विष्णूरुपातील फोटो प्रसिद्ध झाल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. छायाचित्रामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते जयकुमार हिरेमठ यांनी तक्रार दाखल केली होती. 
 
२०१३ मधील संबंधित छायाचित्रात धोनीच्या हातात खाण्याच्या विविध वस्तू आहेत. यामध्ये बुटाचा समावेश होता.  आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्हा येथील एका स्थानिक न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटही जारी केले होते. त्यानंतर धोनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 
 
आपल्याला त्रास देण्यासाठी खटला दाखल करण्यात आलाय असे त्याने न्यायालायत सांगितले होते.  आपल्या विरोधातील गुन्हेगारी कारवाई रद्द करावी अशी त्याने विनंती केली होती. अखेर न्यायालयाने आज धोनीचा युक्तीवाद मान्य करत त्याला दिलासा दिला. 
 

Web Title: Supreme Court relief to Dhoni in connection with Lord Vishnu's photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.