'ओटीटी'वर पॉर्नोग्राफी दाखवली जातेय, वेबसीरिजचे स्क्रीनिंग गरजेचे; सुप्रीम कोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 06:19 PM2021-03-04T18:19:49+5:302021-03-04T18:22:58+5:30
केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित होणाऱ्या कंटेंटसंदर्भात नियमावली आणणार असल्याचे म्हटले आहे. यातच सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान ओटीटी दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटबाबत चिंता व्यक्त केली आहे. (supreme court says even pornography is being shown on ott platforms some balance needed)
नवी दिल्ली : गेल्या काही कालावधीपासून ओटीटी म्हणजे ‘ओव्हर द टॉप’चे प्रस्त वाढत चालले आहे. मात्र, त्यावर प्रसारित होणाऱ्या वेबसीरिज संदर्भात अनेक स्तरावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित होणाऱ्या कंटेंटसंदर्भात नियमावली आणणार असल्याचे म्हटले आहे. यातच सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान ओटीटी दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटबाबत चिंता व्यक्त केली आहे. (supreme court says even pornography is being shown on ott platforms some balance needed)
सर्वोच्च न्यायालय ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात केंद्र सरकारने तयार केलेली नियमावली पाहणार आहे. काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफी दाखवली जात आहे. ओटीटीवर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचंही स्क्रीनिंग होणे गरजेचे आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. अपर्णा यांच्या अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर न्यायालयामध्ये केवळ दोन मिनिटांची सुनावणी झाली.
Truecaller ने लॉन्च केले नवीन अॅप; आता व्यक्तीलाही ट्रॅक करता येणार
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचेही स्क्रीनिंग व्हायला हवे, असे मत व्यक्त केले. ज्याप्रमाणे सेन्सॉर बोर्ड चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो पाहून त्यामधील बदल सुचवते, त्याचप्रमाणे ओटीटीवरील कंटेंटसाठीही अशा प्रकारचे प्रदर्शानापूर्वी स्क्रीनिंग झाले पाहिजे. हा कंटेंट दाखवण्याची परवानगी मिळाल्यावरच तो दाखवण्यात आला पाहिजे, याकडे सर्वोच्च न्यायालयाने लक्ष वेधले आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात नियम नुकतेच जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणातील अर्जदार केवळ अॅमेझॉनच्या एक कर्मचारी आहेत. ही सीरियल बनवली, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. आमच्याविरोधात १० ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी भूमिका अपर्णा पुरोहित यांच्यावतीने विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी मांडली. याच भूमिकेवर भाष्य करताना न्या. भूषण यांनी ज्या गोष्टी ओटीटीवर दाखवल्या जातात, त्यामध्ये काही वेळेस पॉर्नोग्राफीही असते, असे मत नोंदवले. या याचिकेवरील सुनावणी आता पुढील शुक्रवारी होणार आहे.
दरम्यान, अॅमेझॉन प्राईमवरील ‘तांडव’ या वेबसीरीजमुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अपर्णा पुरोहित यांच्यासहीत अनेक कलाकार आणि निर्देशकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने अपर्णा पुरोहित यांची अटकपूर्व जामीनासंदर्भातील याचिका फेटाळली लावली. यानंतर अपर्णा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.