आरोपींना निवडणूकबंदीबाबत सुप्रीम कोर्टाकडून आज निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 04:46 AM2018-09-25T04:46:40+5:302018-09-25T04:46:54+5:30
खून, बलात्कार आणि अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे खटले ज्यांच्याविरुद्ध सुरू आहेत, अशा व्यक्तींनाही संसद व विधानसभेची निवडणूक लढविण्यास बंदी करावी
नवी दिल्ली - खून, बलात्कार आणि अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे खटले ज्यांच्याविरुद्ध सुरू आहेत, अशा व्यक्तींनाही संसद व विधानसभेची निवडणूक लढविण्यास बंदी करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ मंगळवारी निकाल जाहीर करणार आहे.
लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार सध्या फौजदारी खटल्यांत दोषी ठरलेल्यांवर निवडणूकबंदी लागू आहे. पब्लिक इंटरेस्ट फाऊंडेशन व अॅड. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी केलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. रोहिंग्टन नरिमन, न्या. अजय खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता.