एआयपीएमटीबद्दल सुप्रीम कोर्टाचा निर्णय राखीव

By admin | Published: June 13, 2015 12:03 AM2015-06-13T00:03:15+5:302015-06-13T00:03:15+5:30

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अ.भा. वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा २०१५ पुन्हा घेण्याबाबत निर्णय राखून ठेवला आहे. ३ मे रोजी झालेल्या

Supreme court verdict reserved for AIPMT | एआयपीएमटीबद्दल सुप्रीम कोर्टाचा निर्णय राखीव

एआयपीएमटीबद्दल सुप्रीम कोर्टाचा निर्णय राखीव

Next

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अ.भा. वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा २०१५ पुन्हा घेण्याबाबत निर्णय राखून ठेवला आहे. ३ मे रोजी झालेल्या परीक्षेच्या अ‍ॅन्सर की फोडण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात घोटाळा उघडकीस
आला.
आर. के. अग्रवाल आणि अमिताभ रॉय यांच्या खंडपीठाने लवकरच याबाबत आदेश देणार असल्याचे स्पष्ट करीत तोपर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर करू नये, असे सीबीएसईला बजावले आहे. एका विद्यार्थ्याला लाभ झाला असेल तरी संपूर्ण परीक्षेचे वातावरण नासवले जाईल. भूतकाळातील घटना पाहता आम्ही सीबीएसईला दोषी मानत नाही.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असलेले घोटाळे पाहता सीबीएसईने पूर्ण खबरदारी घ्यायला हवी होती, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. ६.३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे पाहता संपूर्ण परीक्षा रद्द करता येणार नाही, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल रंजितकुमार यांनी केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Supreme court verdict reserved for AIPMT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.