‘आधार’, आरक्षणाचा आज फैसला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 06:19 AM2018-09-26T06:19:36+5:302018-09-26T06:19:48+5:30
‘आधार’सक्तीची घटनात्मक वैधता आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती-जमातींना आरक्षणाने बढत्या देताना पाळायचे निकष या संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणांचे निकाल सर्वोच्च न्यायालय बुधवारी देणार आहे.
Next
नवी दिल्ली : ‘आधार’सक्तीची घटनात्मक वैधता आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती-जमातींना आरक्षणाने बढत्या देताना पाळायचे निकष या संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणांचे निकाल सर्वोच्च न्यायालय बुधवारी देणार आहे. ‘आधार’सक्तीच्या कायद्यास आव्हान देणाºया याचिकांवर तब्बल ३९ दिवसांची प्रदीर्घ सुनावणी झाल्यानंतर, गेल्या १९ मे रोजी निकाल राखून ठेवला होता. बढत्यांमधील आरक्षणाच्या केसमध्ये सन २००६ मध्ये एम. नागराज प्रकरणात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालाचा फेरविचार करण्याची गरज आहे का, याचा निर्णय व्हायचा आहे.