विधान परिषदेवरील नियुक्त्यांचे आदेश राज्यपालांना देणार नाही : सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 07:00 AM2021-07-03T07:00:01+5:302021-07-03T07:00:46+5:30

विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने मंत्रिमंडळात शिफारस केलेल्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठविण्यात आली होती.

The Supreme Court will not order appointments to the Legislative Council | विधान परिषदेवरील नियुक्त्यांचे आदेश राज्यपालांना देणार नाही : सर्वोच्च न्यायालय

विधान परिषदेवरील नियुक्त्यांचे आदेश राज्यपालांना देणार नाही : सर्वोच्च न्यायालय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानपरिषदेवरील नियुक्त्यांचे आदेश आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देणार नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील याचिका शुक्रवारी फेटाळून लावली. राज्यपालांना सल्ला देणे हे आमचे काम नाही, असे न्यायालयाने याचिकादाराला सुनावले.

विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने मंत्रिमंडळात शिफारस केलेल्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठविण्यात आली होती. मात्र त्या नियुक्त्यांबद्दल कोश्यारी यांनी अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर लातूर येथील डॉ. जगन्नाथ पाटील यांनी ही याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेत परस्पर दुरुस्ती करू शकत नाही. 

मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना उत्तर

विधानसभा अध्यक्षांची निवड योग्य वेळी करू
विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची तारीख आधीच  निश्चित करणे योग्य नाही. कोरोनामुळे सदस्यांचे आरोग्याची खात्री झाल्यानंतर योग्य वेळेत ही
निवड करण्यात येईल, असे उत्तर मुख्यमंत्र्यानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविले आहे.    

Web Title: The Supreme Court will not order appointments to the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.