Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी प्रकरणात SC चा मोठा निर्णय; 'शिवलिंगा'ची जागा सील करण्याचा अन् नमाज सुरू ठेवण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 06:11 PM2022-05-17T18:11:37+5:302022-05-17T19:29:03+5:30

Supreme court's big decision on Gyanvapi masjid case; Order to seal the place of Shivling and continue namaz : सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी गुरुवारची तारीख निश्चित केली आहे...

Supreme court's big decision on Gyanvapi masjid case; Order to seal the place of Shivling and continue namaz | Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी प्रकरणात SC चा मोठा निर्णय; 'शिवलिंगा'ची जागा सील करण्याचा अन् नमाज सुरू ठेवण्याचा आदेश

Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी प्रकरणात SC चा मोठा निर्णय; 'शिवलिंगा'ची जागा सील करण्याचा अन् नमाज सुरू ठेवण्याचा आदेश

googlenewsNext

ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील वादावर सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जिला प्रशासनाला आदेश देत, ज्या ठिकाणी 'शिवलिंग' आढळून आले, ते ठिकाण सील करण्यात यावे आणि त्याला संपूर्ण सुरक्षा देण्यात यावी. तसेच, नमाजमध्येही व्यत्यय येऊ नये, असे म्हटले आहे.

याच बरोबर सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी गुरुवारची तारीख निश्चित केली आहे. सर्वोच्च न्यायालय निर्णय देताना म्हणाले, 'पुढील सुनावणीपर्यंत आपण वाराणसी डीएम यांना आदेश देत आहोत, की शिवलिंग आढळून आलेल्या स्थळाचे संरक्षण करण्यात यावे. पण, मुस्लीम समाजाला नमाज पठणासाठी कुठल्याही प्रकारची समस्या येऊ नये.'

यावर उत्तर प्रदेशचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले, की मशिदीतील वझूखान्यात म्हणजेच हात-पाय धुण्याच्या ठिकाणी शिवलिंग सापडले आहे. प्रार्थनेचे ठिकाण वेगळे आहे. या ठिकाणी शिवलिंगाला इजा पोहोचण्याची शक्यता आहे. नमाजची जागा वेगळी असते.

न्यायालय म्हणाले, आम्ही खालच्या कोर्टाला आपल्या याचिकांवर लवकरात लवकर सुनावणीचे निर्देश देत आहोत. यावर मुस्लिम पक्षाचे वकील म्हणाले, पण आपण परिसर कशा प्रकारे सील करत आहात? आपण स्थिती बदलत आहात. हे आमची बाजू न ऐकताच IA मध्ये पास झाले आहे. हे सर्व आदेश अवैध आहेत. हे आमचे म्हणणे ऐकल्या शिवाय संपत्ती सील करण्यासारखे आहे. आपण मशिदीत नमाजची जागाही मर्यादित करत आहात. 
 

Web Title: Supreme court's big decision on Gyanvapi masjid case; Order to seal the place of Shivling and continue namaz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.