गायत्री प्रजापतींच्या अटकेस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
By admin | Published: March 6, 2017 02:15 PM2017-03-06T14:15:52+5:302017-03-06T14:15:52+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारमधील वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती यांना आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारमधील वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती यांना आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या प्रजापती यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेस स्थगिती देण्यास नकार दिला.
प्रजापती यांच्यावर बलात्काराचा आरोप असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून ते अटक टाळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अटक टाळण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायलयाने त्यांना या प्रकरणी खालच्या न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे. अजामिनपात्र वॉरंट बजावलेले असल्याने प्रजापती यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले. दरम्यान, प्रजापती यांच्यावरील आरोपांमुळे बुधवारी होणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी समाजवादी पक्षाच्या अडचणी अधिकच वाढणार आहेत.
#FLASH No relief for UP minister Gayatri Prajapati from Supreme Court, SC asks him to approach concerned court pic.twitter.com/XQqJzbh5vk
— ANI UP (@ANINewsUP) March 6, 2017