राज्यसभा निवडणुकीत नोटाच्या वापराला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 12:56 PM2018-08-21T12:56:03+5:302018-08-21T12:56:15+5:30
सर्वोच्च न्यायालयानं राज्यसभा निवडणुकीत नोटाचा पर्याय वापरण्यास नकार दिला आहे.
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं राज्यसभा निवडणुकीत नोटाचा पर्याय वापरण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पीठानं राज्यसभा निवडणुकीत बॅलेटमध्ये नोटाचा पर्याय देण्याची निवडणूक आयोगाची अधिसूचना रद्द केली आहे.
न्यायालयानं आयोगाच्या अधिसूचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नोटाचा पर्याय हा सामान्य मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. काँग्रेसच्या शैलेश मनुभाई परमार यांनी याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत त्यांनी गुजरात विधानसभेतील काँग्रेसच्या सर्व आमदारांना व्हिप बजावला होता. ज्यात पक्षाचे नेते अहमद पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. परमार यांनी बॅलेटमध्ये निवडणूक आयोगानं दिलेल्या नोटाच्या पर्यायाला आव्हान दिलं आहे.