'नीट' परिक्षेसंबंधी निर्णय बदलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
By admin | Published: April 30, 2016 01:55 PM2016-04-30T13:55:40+5:302016-04-30T13:59:11+5:30
नीट परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती जी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे, यामुळे नीट परिक्षा 1 मे रोजी होणार हे स्पष्ट झालं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 30 - 'नीट' परिक्षेबाबात विद्यार्थ्यांमधील संभ्रमाचं वातावरण अजूनही संपलं नसताना आता सर्वोच्च न्यायालयानेदेखील विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली आहे. नीट परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती जी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे ठरल्याप्रमाणे नीट परिक्षा 1 मे रोजी होणार हे स्पष्ट झालं आहे.
सर्वोच्च न्यायलायने गुरुवारी दिलेला आपला निर्णय बदलण्याची मागणी फेटाळली आहे. यावेळी न्यायालयाने विद्यार्थ्यांनी अभ्यासा लक्ष देण्याचा सल्लाही दिला आहे. नीट परीक्षा आणि राज्यांच्या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम वेगवेगळा असल्यामुळे परिक्षेसाठी तयारी करणं अवघड जात असल्याचं काही विद्यार्थ्यांनी याचिकेत म्हटलं होतं. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून आता सोमवारी होणा-या पुनर्विचार याचिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
दरम्यान नांदेडमध्ये विद्यार्थांनी जिल्हाधिका-यांनी निवेदन देत 'नीट'चा संभ्रम दूर करण्याची मागणी केली आहे. ४०० विद्यार्थी आणि पालक जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा घेऊन गेले होते.