'सत्यमेव जयते' प्रकरणी आमिर खानला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

By admin | Published: July 22, 2016 01:22 PM2016-07-22T13:22:29+5:302016-07-22T13:24:03+5:30

'सत्यमेव जयते' या राष्ट्रीय ब्रीदवाक्याचा गैरवापर केल्याप्रकरणी अभिनेता आमिर खानविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने आमिरला दिलासा मिळाला आहे.

Supreme Court's relief to Aamir Khan in 'Satyamev Jayate' case | 'सत्यमेव जयते' प्रकरणी आमिर खानला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

'सत्यमेव जयते' प्रकरणी आमिर खानला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - 'सत्यमेव जयते' या राष्ट्रीय ब्रीदवाक्याचा गैरवापर केल्याप्रकरणी अभिनेता आमिर खानविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने आमिरला दिलासा मिळाला आहे. ' अराइव्ह सेफ सोसायटी' या एनजीओतर्फे दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत चीफ जस्टिस टी.एस.ठाकूर यांच्या खंडपीठाने ही याचिका रद्द केली.
चंदीगडचे रहिवासी असलेले हरमन.एस.सिंधू यांनी अराइव्ह सेफ सोसायटीतर्फे आमिर खानच्या प्रॉडक्शनविरोधात याचिका दाखल करत ' सत्यमेव जयते' या राष्ट्रीय ब्रीदवाक्याचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी सिंधू यांची  काही विशिष्ट तक्रार असल्यास ते पोलिसांत जाऊ शकतात, असेही न्यायालयाने आपला निर्णय सुनावताना नमूद केले. 
दरम्यान याप्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने ३ नोव्हेंबर २०१५ रोजी फेटाळून लावली होती. न्यायालयाच्या या निर्णयाला सिंधू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 

Web Title: Supreme Court's relief to Aamir Khan in 'Satyamev Jayate' case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.