पोंगलआधी जल्लीकट्टूवर निर्णय देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
By admin | Published: January 12, 2017 01:34 PM2017-01-12T13:34:23+5:302017-01-12T13:34:23+5:30
तामिळनाडूमध्ये पोंगल सणामध्ये खेळल्या जाणा-या जल्लीकट्टूला परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - तामिळनाडूमध्ये पोंगल सणामध्ये खेळल्या जाणा-या जल्लीकट्टूला परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. शनिवारी पोंगल सण साजरा होणार असून त्याआधीच निर्णय देण्यात यावा, जेणेकरुन जल्लीकट्टूबात स्पष्टता राहिल अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने दोन दिवस आधी निर्णय देण्यास नकार दिला आहे.
न्यायालय शनिवारी यासंबंधी आपला निर्णय देणार असून दोन दिवस आधीच खंडपीठाकडे निर्णय देण्याची मागणी करणं अयोग्य असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. 'या निर्णयाचा मसुदा तयार करण्यात आला असून, शनिवारआधी निर्णय देणं शक्य नाही', असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
2014 मध्ये न्यायालयाने जनावरांवरील क्रूरता लक्षात घेता जल्लीकट्टूवर बंदी घातली होती. मात्र या निर्णयाला तामिळनाडूमधील राजकीय पक्षांनी विरोध केला होता. गतवर्षी न्यायालयाने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी करणारी याचिका करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती याचिकादेखील फेटाळली होती.