कोरोना आणि बेरोजगारीवरून सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मोदी सरकारला घेरले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 04:16 PM2020-09-14T16:16:29+5:302020-09-14T16:16:38+5:30
कामकाजाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोना आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून प्रश्नांची सरबत्ती करत केंद्रातील मोदी सरकारला घेरले.
नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, कामकाजाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोना आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून प्रश्नांची सरबत्ती करत केंद्रातील मोदी सरकारला घेरले.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेतील आजच्या कामकाजाबाबतचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून याबाबतची माहिती दिली. त्यात त्या म्हणाल्या, ह्यह्णलोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बेरोजगारी आणि कोरोनाचा विषय सभागृहात मांडला. कोरोनामुळे आपल्यासह जगभरातील बहुतांश देशांना मोठा फटका बसला.यामुळे झालेली हानी भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. परंतु असं होताना दिसत नाही, अशी टीका सुळे यांनी केली.
लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बेरोजगारी आणि कोरोनाचा विषय सभागृहात मांडला.कोरोनामुळे आपल्यासह जगभरातील बहुतांश देशांना मोठा फटका बसला.यामुळे झालेली हानी भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे.परंतु असं होताना दिसत नाही. pic.twitter.com/MmwNSYUm1N
— Supriya Sule (@supriya_sule) September 14, 2020
अधीररंजन चौधरी यांची जबाबदारी वाढली
संसदेचे पावसाळी अधिवेच्या शन आजपासून सुरू झाले असून, कोरोनामुळे सध्या सभागृहांचे कामकाज रोज चारच तास चालणार आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपचारांसाठी शनिवारी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी हेही गेले असल्याने दोन्ही नेते काही दिवस लोकसभेत नसतील. त्यामुळे लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांची जबाबदारी वाढली आहे.
१७ खासदारांना कोरोनाचा संसर्ग
आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या अधिवेशनापूर्वी सर्वच खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये लोकसभा सभागृहातील 17 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाबाधित झालेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक भाजपाचे खासदार असून त्यांची संख्या बारा आहे. वायएसआर काँग्रेसच्या 2, शिवसेना, डीएमके आणि आरएलपी पक्षाच्या प्रत्येकी एक खासदारास कोरोनाची लागण झाली आहे. आज सकाळी या सर्वच खासदारांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने संसद परिसरात कोरोनाची चर्चाही चांगलीच रंगली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी