लोकसभेत सुप्रिया सुळेंचा संताप; म्हणाल्या, “AAP ने आम्हाला चोर म्हटले ठीक आहे, पण...”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 08:14 PM2023-08-03T20:14:25+5:302023-08-03T20:15:50+5:30

Supriya Sule in Lok Sabha: घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहेच. प्रतिभा शरद पवार यांची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर सडकून टीका केली.

supriya sule criticises bjp over delhi government bill officer transfer in lok sabha | लोकसभेत सुप्रिया सुळेंचा संताप; म्हणाल्या, “AAP ने आम्हाला चोर म्हटले ठीक आहे, पण...”

लोकसभेत सुप्रिया सुळेंचा संताप; म्हणाल्या, “AAP ने आम्हाला चोर म्हटले ठीक आहे, पण...”

googlenewsNext

Supriya Sule in Lok Sabha: लोकसभेत दिल्लीतील सेवा विधेयकावर चर्चा झाली. चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेत संमत झाले. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. या चर्चेत सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजपवर सडकून टीका केली. आम आदमी पक्षाने आम्हाला चोर म्हटले ठीक आहे मान्य आहे, मात्र भाजपनेही आम्हाला चोर म्हटले. माझ्या बारामती मतदारसंघात येऊन नॅशनल करप्टेड पार्टी, असे भाजपच्या नेत्यांनी म्हटले याचे उत्तर सरकारने द्यावे, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला. 

भाजपकडून कायमच घराणेशाहीचा मुद्दा कायम पुढे केला जातो. मी स्वतः घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहेच. प्रतिभा शरद पवार यांची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे. पण. भाजपला एक प्रांजळ प्रश्न विचारायचा आहे, घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता मग एनडीएची बैठक जेव्हा होते तेव्हा जी. के. वासन, चिराग पासवान, दुष्यंत चौटाला हे सगळे असतात. हे सगळे घराणेशाहीचे मेरिट सांगणारे नाहीत का? तुमच्या बरोबर असले तर मेरिट आम्ही जर बरोबर असलो तर घराणेशाही असे कसे काय चालेल, अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच भाजप खासदारांची, आमदारांची पहिली, दुसरी आणि तिसरी पिढी राजकारणात झाली तरीही चालते. मात्र आम्ही केले तर ती घराणेशाही असते. यावर स्पष्टीकरण हवे आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दिल्लीत राज्यपाल ढवळाढवळ करतात, हा कोणता न्याय?

२०१४ आणि २०१९ मध्ये पूर्ण बहुमत मिळाले आहे आणि आम्ही विजयी झालो आहोत याचा डंका भाजपकडून वाजवला जातो. अरविंद केजरीवाल यांना एक नियम आणि केंद्राला एक नियम हा कुठला न्याय आहे. दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांना कौल दिला आहे. तिथे राज्यपाल ढवळाढवळ करत आहेत. हा नेमका कुठला न्याय आहे. लोकशाहीच्या मार्गाने अरविंद केजरीवाल यांना दिल्ली आणि पंजाबची निवडणूक जिंकता आली, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं जम्मू-काश्मीरमध्ये एक वर्षात निवडणुका घेऊ, चार वर्षे झाले निवडणुका झाल्या नाहीत. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन भाजपने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. पण केंद्रात सरकार आल्यानंतर भाजप या घोषणेची पूर्तता करू शकले नाही. त्यामुळे भाजप सरकारने हा जुमला होता असे मान्य करावे आणि माफी मागावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. 

दरम्यान, हे सगळे आता नैतिकतेच्या गोष्टी करत आहेत. यांनी सांगितलं दिल्लीच्या सचिवांना मारहाण झाली. मग महाराष्ट्रात काय झालं? तिथे अधिकाऱ्यालाही मारहाण झाली. तिथे तुमचे १०५ आमदार आहेत. महाराष्ट्रातही अधिकाऱ्याला मारहाण झाली ती बाबही चुकीचीच आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 

Web Title: supriya sule criticises bjp over delhi government bill officer transfer in lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.