जमत नसेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या खा़ सुप्रिया सुळे: सामाजिक अस्थितरतेला सरकार जबाबदार
By admin | Published: October 5, 2016 12:20 AM2016-10-05T00:20:05+5:302016-10-05T00:20:23+5:30
अहमदनगर: दररोज लाखोंच्या संखेने निघणार्या मोर्चांनी सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे़ राज्यात सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे़ मुख्यमंत्र्यांचीही चिडचड वाढली आहे़ त्यांना राज्याचा कारभार करणं जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी येथे केले़
अहमदनगर: दररोज लाखोंच्या संखेने निघणार्या मोर्चांनी सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे़ राज्यात सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे़ मुख्यमंत्र्यांचीही चिडचड वाढली आहे़ त्यांना राज्याचा कारभार करणं जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी येथे केले़
येथील राष्ट्रवादी भवनमध्ये झालेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या़ शहरजिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, आ़ अरुण जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गंुड, आ़संग्राम जगताप, वैभव पिचड, राहुल जगताप, माजी आमदार दादा कळमकर, चंद्रशेखर घुले आदी व्यासपीठावर होते़ सुप्रिया सुळे यांनी सरकारावर सडकून टिका केली़ त्या म्हणाल्या, कोपर्डी येथील एका चिमूरडीवर अमानुषपणे अत्याचार झाला़ या घटनेला तीन महिने पूर्ण होत आले आहेत़ मात्र अद्याप चार्टशीट दाखल होऊ शकली नाही़ विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगूनही चार्टशीट दाखल होत नसेल तर राज्यात काय अवस्था आहे, याची कल्पना येते, असेही त्या म्हणाल्या़
शेती मालाचे भाव पडले आहेत़ कवडीमोल भावाने भाजीपाला विकला जात आहे़ कांदे, बटाटे तर फेकून देण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे़ दुसरीकडे महिलाही सुरक्षित नाहीत़ लाखोंच्या संखेने मोर्चे निघत असून, राज्यात चिंताजनक परिस्थिती आहे़ केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, या दोघांनी मिळून देशाचा बट्ट्याबोळ चालविला आहे़ उरलेसुरले अतिमशहाही अहेतच, बातम्या दडवून ठेवायला, असे सांगून सध्या राज्य अडचणीतून वाटचाल करत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली़
़़़़़़़़़़़़़़़़़़
मुख्यमंत्री हलक्या कानाचा
मराठा क्रांती मोर्चोबाबत मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी केलेल्या विधानाबाबत पत्रकांनी छेडले असता मुख्यमंत्री एवढ्या हलक्या कानाचा असेल असे वाटले नव्हते़ प्रस्थापितांविरोधात विस्थापितांचे हे मोर्चे आहेत, असे जर राज्याचा मुख्यमंत्री म्हणत असेल तर ते दुर्देव्य आहे़ सरकार म्हणजे काही लाल दिव्याची गाडी नाही़ म्हणून त्यांची जबाबदार आहे़ इच्छा शक्ती असेल तर ते प्रश्न सोडवू शकतात, असे त्या म्हणाल्या़
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
विरोधात काम करणार्यांचा कार्यक्रम
विधानसभेत झालेली चुक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, निवडणूकीत विरोधात काम करणार्यांचा काय कार्यक्रम करायचा तो करू, असे सांगून जिल्हा परिषदेची चावी राष्ट्रवादीकडेच राहिल, असा निर्धार यांनी यावेळी केला़