सुप्रिया सुळेंनी संसदेत पीएम मोदींचे केले कौतुक, 'या' भाजप नेत्यांची करुन दिली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 08:34 PM2023-09-18T20:34:41+5:302023-09-18T20:35:22+5:30
आज खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी जुन्या संसद भवनात लोकसभेत आपले शेवटचे भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे पूर्ववर्ती पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या देशासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.
संसदेत माझे ८०० भाऊ; इरिगेशन घोटाळा चौकशीवरुन सुप्रिया सुळेंनी गाजवलं भाषण
१४-१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री संविधान सभेत जवाहरलाल नेहरूंनी दिलेल्या 'ट्रिस्ट विथ डेस्टिनी' या ऐतिहासिक भाषणाचे स्मरण करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, पंडित नेहरूंचे ते भाषण आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील. आपल्या भाषणात त्यांनी संसदेच्या ७५ वर्षांचे ऐतिहासिक योगदानही सभागृहासमोर ठेवले.
संसदेत अनेकांनी पीएम मोदींच्या भाषणाचे कौतुक केले. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कौतुक केले. यासोबतच त्यांनी पंतप्रधान मोदींना भाजप नेत्यांची आठवणही करुन दिली. पीएम मोदींनी आपल्या भाषणात त्या नेत्यांची नाव घ्यायला विसरले होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी पंतप्रधानांच्या आजच्या भाषणाचे कौतुक करते, यात त्यांनी प्रशासन म्हणजे सातत्य आहे. आपल्या सर्वांना समान प्रिय असलेल्या या देशाच्या उभारणीत गेल्या ७ दशकांमध्ये विविध लोकांनी योगदान दिले आहे. तुम्ही इंडिया म्हणा किंवा भारत, तो तुमचा देश आहे. आपण सर्व येथे जन्मलो आहोत, आपण सर्वजण येथे आलो आहोत याचा आनंद आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आज भाजपने ज्यांचा उल्लेख केलेला नाही, ज्यांच्यामुळे माझ्या संसदीय कार्यात माझ्यावर खूप प्रभाव आहे आणि ते भाजपचे आहेत अशा दोन व्यक्तींची नोंद मी नोंदवू इच्छिते. सुषमा स्वराज आणि अरुण जेटली - ज्यांचा आपण आदर केला ते महान नेते आणि असामान्य संसदपटूंपैकी एक होते असे मला अजूनही वाटते. ते सहकारी संघराज्याबद्दल बोलत राहिले.
संसदेच्या जुन्या इमारतीचा वारसा आणि त्यात रुजलेल्या लोकशाही मूल्यांचे कौतुक करून सुळे यांनी केंद्र सरकारला महाराष्ट्रातील सिंचन आणि बँक घोटाळ्यांची चौकशी सुरू करण्याची विनंती केली.
#WATCH | NCP MP Supriya Sule says, "...I appreciate the PM's speech today where he appreciated that governance is continuity. Various people have contributed over the last 7 decades to build this country which we all love equally. Whether you call it India or Bharat, it is your… pic.twitter.com/UYMOx0G8Po
— ANI (@ANI) September 18, 2023