धक्कादायक! सूरतमध्ये इमारत कोसळली, ७ जणांचा मृत्यू; रात्रीपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 08:13 AM2024-07-07T08:13:31+5:302024-07-07T08:21:37+5:30

सहा मजली इमारतीत ३५ खोल्या असून त्यात पाच ते सात कुटुंबं जीव धोक्यात घालून राहत होती.

surat 6 storey building collapsed seven bodies found in rescue operation | धक्कादायक! सूरतमध्ये इमारत कोसळली, ७ जणांचा मृत्यू; रात्रीपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

धक्कादायक! सूरतमध्ये इमारत कोसळली, ७ जणांचा मृत्यू; रात्रीपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

सूरतच्या सचिन पाली गावात शनिवारी (६ जुलै) धक्कादायक घटना घडली आहे. सहा मजली इमारत कोसळली, त्यामुळे अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ते रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत. याच दरम्यान, सूरतचे मुख्य अग्निशमन अधिकारी बसंत पारीक यांनी सांगितलं की, रात्रभर चाललेल्या शोध मोहिमेत सात मृतदेह सापडले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, अजूनही बरेच लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. ही जुनी इमारत होती, त्यामुळे अचानक कोसळली असल्याचं सांगण्यात येत आहे. या सहा मजली इमारतीत ३५ खोल्या असून त्यात पाच ते सात कुटुंबं जीव धोक्यात घालून राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण इमारतीची मालक एक विदेशी महिला आहे.

इमारत कोसळण्या मागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुसळधार पावसामुळे जुनी झालेली इमारत कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. सूरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी सांगितलं की, इमारत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आलं. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफची टीम मेहनत घेत आहे.

अनुपम सिंह गेहलोत पुढे म्हणाले की, ही इमारत २०१६-१७ मध्ये बांधण्यात आली होती. सुमारे पाच फ्लॅटमध्ये लोक राहत होते, त्यापैकी बहुतेक लोक या भागातील कारखान्यांमध्ये काम करत होते. जेव्हा बचावकार्य सुरू झाले तेव्हा आम्हाला अडकलेल्या लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला. घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तपास अहवालाच्या आधारे दोषींवर कारवाई केली जाईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.


 

Web Title: surat 6 storey building collapsed seven bodies found in rescue operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.