बापरे! लॉकडाऊनचा फटका बसल्याने हिरे व्यापारी बनला दरोडेखोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 10:41 AM2021-01-15T10:41:33+5:302021-01-15T10:47:27+5:30

Crime News : लॉकडाऊनमध्ये मोठा आर्थिक फटका बसल्याने सूरतमधील हिरे व्यापारी दरोडेखोर बनला आहे.

surat merchant turned into robbery when factory closes in locadown | बापरे! लॉकडाऊनचा फटका बसल्याने हिरे व्यापारी बनला दरोडेखोर

बापरे! लॉकडाऊनचा फटका बसल्याने हिरे व्यापारी बनला दरोडेखोर

Next

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर हातावरचे पोट असणाऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशीच काहीशी घटना सूरतमध्ये घडली आहे. लॉकडाऊनमध्ये मोठा आर्थिक फटका बसल्याने सूरतमधील हिरे व्यापारी दरोडेखोर बनला आहे. व्यापाऱ्याने गुन्ह्याचा मार्ग अवलंबला आहे. उदयवीर सिंह तोमर उर्फ पप्पू असं या व्यापाऱ्याचं नाव असून ते हिरे पॉलिश करण्याचं काम करायचा मात्र देशात कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्याने हिरे व्यापारालाही फटका बसला. 

मिळालेल्या माहितीनुसार, हिरे व्यापारी उदयवीर सिंह तोमर उर्फ पप्पूकडे आपले हिरे पॉलिश करण्यासाठी दिले जायचे. मात्र व्यवसायाला फटका बसल्याने उदयवीर तोमरने गुन्ह्याचा मार्ग अवलंबला आहे. हिरे पोहोचवणाऱ्या अंगडियांना लक्ष्य करण्यासाठी त्याने सशस्त्र दरोडेखोरांची टोळी एक टोळी तयार केली. मात्र तोमर आणि त्याच्या टोळीतील साथीदारांना पोलिसांनीअटक केली आहे. त्यांच्याकडी पिस्तूल, चाकू, हातोडा, मिरची पूड, नायलॉनची दोरी असं सामान जप्त करण्यात आलं आहे. 

उदयवीर सिंह तोमर सूरतच्या कापोद्रा क्षेत्रातील रचना सोसायटीजवळील सत्य नारायण सोसायटीमध्ये हिऱ्याचा कारखाना चालवत होता. मात्र देशामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाईनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनचा मोठा फटका हा सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना बसला. तसाच तो हिरे व्यापारालाही बसला. लॉकडाऊनमध्ये कारखाना बंद झाल्या कारणाने व्यापाऱ्याने चोरी करण्याची योजना तयार केली. क्राईम ब्रांचने याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. 

अजीत न्हारसिंह चौहाण, रोनीत उर्फ मोहित तुलसी चौहाण, रितेश उर्फ टाईगर रामविनोद परमार, उदयविरसिंह उर्फ पप्पु राजबहादुर सिंह तोमर आणि रवि प्रतापसिंह तोमर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून काही सामान देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. लॉकडाऊनचा फटका बसल्याने दरोडेखोरीकडे वळल्याची माहिती त्यांनी पोलिसांना चौकशीदरम्यान दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: surat merchant turned into robbery when factory closes in locadown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.