सुरतच्या पोलीस कर्मचार्‍याचा जळगावात उष्माघाताने मृत्यू?

By admin | Published: May 3, 2016 12:09 AM2016-05-03T00:09:20+5:302016-05-03T00:09:20+5:30

जळगाव : लग्न समारंभासाठी नातेवाईकाकडे आलेल्या सुरत येथील एका पोलीस कर्मचार्‍याचा जळगावात मृत्यू झाल्याची घटना १ मे रोजी घडली. दरम्यान, या कर्मचार्‍याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय आहे. परंतु त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

Surat police officer dies in heat wave in Jalgaon? | सुरतच्या पोलीस कर्मचार्‍याचा जळगावात उष्माघाताने मृत्यू?

सुरतच्या पोलीस कर्मचार्‍याचा जळगावात उष्माघाताने मृत्यू?

Next
गाव : लग्न समारंभासाठी नातेवाईकाकडे आलेल्या सुरत येथील एका पोलीस कर्मचार्‍याचा जळगावात मृत्यू झाल्याची घटना १ मे रोजी घडली. दरम्यान, या कर्मचार्‍याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय आहे. परंतु त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
विक्रम गुलाबभाई कापडणे (वय ३६, रा.सुरत) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. ते गुजरात पोलीस दलात सेवारत होते. सुरत येथील आठवा लाइन पोलीस हेड क्वार्टरमध्ये त्यांचे वास्तव्य होते. शिवकॉलनीतील रहिवासी रवींद्र कापडणे यांच्याकडे ते लग्न सोहळ्यासाठी आलेले होते. ते रात्री झोपलेले असताना उठलेच नाहीत. म्हणून नातेवाईकांनी त्यांना बेशुद्धावस्थेतच जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. विक्रम कापडणे यांचा मृत्यू उष्माघाताने झाला आहे की अन्य कारणाने याच्या पडताळणीसाठी त्यांच्या विच्छेदनाचा व्हिसेरा तपासणीसाठी नाशिकला पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर खरे कारण समोर येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

Web Title: Surat police officer dies in heat wave in Jalgaon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.