कौतुकास्पद! भारताच्या लेकींची कमाल, शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा 'लघुग्रह'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 01:29 PM2020-07-28T13:29:17+5:302020-07-28T13:36:03+5:30
दोन विद्यार्थिनींनी अंतराळातील एक लघुग्रह शोधून काढण्याची कमाल केली आहे. नासानेही या शोधाला दुजोरा दिला आहे. HLV2514 असं या नव्या लघुग्रहाला नाव देण्यात आलं आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असताच एक आनंदाची माहिती समोर आली आहे. भारताच्या लेकींनी कमाल केली आहे. मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा लघुग्रह शोधला आहे. गुजरातच्या सूरत शहरातील दोन विद्यार्थिनींनी अंतराळातील एक लघुग्रह शोधून काढण्याची कमाल केली आहे. नासानेही या शोधाला दुजोरा दिला आहे. HLV2514 असं या नव्या लघुग्रहाला नाव देण्यात आलं आहे.
वैदेही वेकारिया आणि राधिका लखानी अशी कमाल केलेल्या या दोन विद्यार्थिनींची नावं आहेत. या दोघीही पीपी सावनी चैतन्य विद्या संकुलात शिकतात. तसेच अंतराळात संशोधन करणाऱ्या नासाशी संबंधित अखिल भारतीय लघुग्रह शोध मोहिमेशी (AIASC) संबंधित आहेत. वैदेही आणि राधिका यांनी खगोलीय अभ्यासाचे प्रशिक्षण SPACE संस्थेत घेतले होते. नासाने ई-मेलद्वारे या शोधाला दुजोरा दिला आहे. विद्यार्थिनींच्या या शोधाचं भरभरून कौतुक केलं जात आहे.
ऑल इंडिया अॅस्टरॉईड सर्च कॅम्पेनचे संचालक डॉक्टर पॅट्रित मिलर यांनी हा लघुग्रह मंगळ ग्रहाच्या जवळ आहे. काही वर्षांनंतर तो पृथ्वीला देखील क्रॉस करू शकतो असं म्हटलं आहे. वैदेही ही भावनगर जिल्ह्याची रहिवासी आहे. तर राधिका ही अमरेली जिल्ह्यातील आहे. आम्ही अंतरिक्षात सुमारे 20 पदार्थांना चिन्हित केले होते. त्याच दरम्यान हा लघूग्रह शोधण्यात यश आले आहे. गुजरातमध्ये पहिल्यांदाच आणि देशात चार वर्षांनंतर नवा लघुग्रह शोधून काढण्यात आहे असे SPACE ते एज्युकेटर आकाश द्विवेदी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : अरे व्वा! जगभरातील तब्बल एक कोटी लोकांनी जिंकली कोरोनाची लढाईhttps://t.co/EyMtsrUfQ0#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 28, 2020
CoronaVirus News : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी औषधं ठरताहेत प्रभावी पण...https://t.co/m6d6ZNccX8#coronavirus#CoronaUpdates#COVID19#WHO
— Lokmat (@MiLOKMAT) July 28, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना लागण
सप्तपदीनंतर नवरा-नवरी पोहोचले थेट पोलीस ठाण्यात; कारण ऐकून तुम्हीही कराल भरभरून कौतुक
CoronaVirus News : मोठं यश! कोरोनाला रोखणारी 21 औषधं सापडली; शास्त्रज्ञांचा दावा
CoronaVirus News : चिंताजनक! 6 आठवड्यात कोरोनाग्रस्तांमध्ये दुप्पट वाढ; WHOने बोलावली इमर्जन्सी बैठक
CoronaVirus News : लढ्याला यश! फक्त 400 रुपयांत होणार कोरोना टेस्ट, एका तासात येणार रिपोर्ट
CoronaVirus News : कडक सॅल्यूट! जंगलातून रस्ता पार करत 'ही' नर्स लोकांपर्यंत पोहचवते मोफत औषधं
काय सांगता? कोरोनाला दूर ठेवणारा Sanitizer Pen आला, लिहिताना हातही होणार स्वच्छ