भेटीगाठींमध्ये सुरेशदादा व्यस्त ७ शिवाजीनगरवर गर्दीचा ओघ कायम: विविध पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी घेतली भेट

By admin | Published: September 5, 2016 12:06 AM2016-09-05T00:06:40+5:302016-09-05T00:06:40+5:30

जळगाव: घरकूल प्रकरणात तब्बल साडेचार वर्षांनंतर जामीन मिळाल्याने शनिवारी ७, शिवाजीनगर या निवासस्थानी परतलेल्या सुरेशदादा जैन यांच्या भेटीसाठी रविवारी देखील जिल्हाभरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा ओघ दिवसभर सुरूच होता. त्यामुळे सुरेशदादांचा पूर्ण दिवस भेटीगाठींमध्येच गेला.

Sureshdaada busy in meeting 7 Shivajinagar rush on crowd: Various party office bearers visit | भेटीगाठींमध्ये सुरेशदादा व्यस्त ७ शिवाजीनगरवर गर्दीचा ओघ कायम: विविध पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी घेतली भेट

भेटीगाठींमध्ये सुरेशदादा व्यस्त ७ शिवाजीनगरवर गर्दीचा ओघ कायम: विविध पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी घेतली भेट

Next
गाव: घरकूल प्रकरणात तब्बल साडेचार वर्षांनंतर जामीन मिळाल्याने शनिवारी ७, शिवाजीनगर या निवासस्थानी परतलेल्या सुरेशदादा जैन यांच्या भेटीसाठी रविवारी देखील जिल्हाभरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा ओघ दिवसभर सुरूच होता. त्यामुळे सुरेशदादांचा पूर्ण दिवस भेटीगाठींमध्येच गेला.
सकाळी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील आदींनी भेट घेतली. तसेच माजी नगराध्यक्ष सिंधूताई कोल्हे, लता भोईटे,पुष्पा पाटील यांनीही दादांची भेट घेतली. भुसावळहून आलेले भाजपाचे अनिल चौधरी यांच्यासह नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, संतोष दाढी, माजी जि.प. सदस्य वसंत झाडखंडे आदींनी दादांची भेट घेऊन चर्चा केली. त्याचवेळी मनसेचे जमील देशपांडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, महानगरप्रमुख गणेश सोनवणे, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे आदी देखील उपस्थित होते.

सायंकाळीही गर्दी
दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास माजी खासदार वसंतराव मोरे तसेच जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार व अन्य काही पुढारी मंडळी दादांच्या भेटीसाठी दाखल झाली. त्यापाठोपाठ अमळनेरचे माजी नगराध्यक्ष गोविंद मुंदडा, काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.ए.जी. भंगाळे, शिवसेनेचे विश्वनाथ पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जळगावातील हितचिंतक आले होते. त्यामुळे बंगल्याच्या आवारात गर्दी झाली होती.

गाळेधारकांनी घेतली भेट
मनपा मालकीच्या १४ मार्केटमधील गाळेधारकांनी शांताराम सोनवणे, राजस कोतवाल यांच्यासह रविवारी सायंकाळी सुरेशदादांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सुरेशदादांनी हा प्रश्न चर्चा करून सोडवू, असे आश्वासन दिल्याची माहिती कोतवाल यांनी दिली.

पुष्पगुच्छांचा ढीग
सुरेशदादांना भेटायला येणार्‍या प्रत्येकानेच पुष्पगुच्छ आणल्याने पुष्पगुच्छांचा ढीग जमला होता. तसेच कार्यकर्त्यांच्या गर्दीने परिसर फुलला होता.

Web Title: Sureshdaada busy in meeting 7 Shivajinagar rush on crowd: Various party office bearers visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.