पुण्याच्या रुग्णाच्या मणक्यावर शस्त्रक्रिया मोफत : उल्हास पाटील रुग्णालयात उपचार
By admin | Published: March 29, 2016 12:25 AM2016-03-29T00:25:10+5:302016-03-29T00:25:10+5:30
जळगाव - पुणे येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले ३६ वर्षीय रुग्णाच्या मानेच्या मणक्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
Next
ज गाव - पुणे येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले ३६ वर्षीय रुग्णाच्या मानेच्या मणक्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पुणे येथे खाजगी वाहन चालक असलेले दीपक भीमराव भटकर हे मूळचे बुलडाणा जिल्ातील शेगाव येथील रहिवासी आहे. व्यवसायानिमित्त ते पुणे येथे वास्तव्यास असून गेल्या दहा वर्षापासून ते वाहन चालकाचे काम करतात. हे काम करत असताना अचानक त्यांच्या डाव्या हाताला मुंग्या येणे, हात दुखणे असा त्रास होऊ लागला. भटकर यांनी सुरवातीला घरगुती इलाज केला. पण हाताचे दुखणे वाढतच गेले. अशा परीस्थितीत त्यांनी पुणे येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्याठिकाणी त्यांना औषधी देण्यात आल्या. मात्र औषधांनी फारसा आराम पडला नाही. त्यामुळे त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. गावी आल्यानंतर त्यांनी खामगाव येथे एका डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी भटकर यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला. रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल यांनी दीपक भटकर यांची एमआरआय तपासणी केली. या तपासणीत भटकर यांच्या डाव्या हाताची नस मानेच्या मणक्याखाली दबली असल्याचे निदान झाले. तसेच भटकर यांना शस्त्रक्रियेचाही सल्ला देण्यात आला. या शस्त्रक्रियेसाठी जास्त खर्च लागणार होता. परंतु डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा त्यांना लाभ मिळवून देण्यात आला. शस्त्रक्रियेदरम्यान अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल व डॉ. साहील कालरा यांनी मणक्यात दबलेली नस गादी काढून मोकळी केली. तसे गादीच्या ठिकाणी कमरेचे हाड टायटॅनियमच्या प्लेटद्वारे बसविण्यात आले. ही शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची होती. परंतु डॉ. दीपक अग्रवाल व डॉ. साहील कालरा यांच्या तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नामुळे शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. आता दीपक भटकर यांना पूर्वीप्रमाणे हाताची हालचाल करता येणे शक्य झाले असून अवघ्या एका दिवसात त्यांना चालता येऊ लागले. तसेच त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे. शस्त्रक्रियेसाठी डॉ. दीपक अग्रवाल व डॉ. साहील कालरा यांना भूलतज्ज्ञ डॉ. देवेंद्र चौधरी, डॉ. सागर, डॉ. पार्थ पटेल, डॉ. अमित वैरागडे, डॉ. देवेशक्रिष्णा यादव, डॉ. शरयु वारे, डॉ. प्रियंका वानखेडे यांनी सहकार्य केले.