Surgical Strike करणारे कमांडो होणार आणखी 'घातक'

By admin | Published: March 1, 2017 12:49 PM2017-03-01T12:49:58+5:302017-03-01T13:02:47+5:30

यशस्वी सर्जिकल स्ट्राईक करणा-या भारतीय सैन्य दलाच्या विशेष कमांडो पथकांना लवकरच घातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले जाणार आहे.

Surgical Strike Commandos Will Be More 'Fatal' | Surgical Strike करणारे कमांडो होणार आणखी 'घातक'

Surgical Strike करणारे कमांडो होणार आणखी 'घातक'

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 1 - मागच्या दोन वर्षात दोनवेळा शत्रूच्या प्रदेशात घुसून यशस्वी सर्जिकल स्ट्राईक करणा-या भारतीय सैन्य दलाच्या विशेष कमांडो पथकांना लवकरच घातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले जाणार आहे. त्यासाठी रखडलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्र खरेदीची प्रक्रिया मार्गी लावण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली.  
 
लवकरच भारतीय कमांडोंना स्नायपर रायफल्स, हलक्या मशिन गन, हलक्या वजनाची रॉकेट लाँचर्स, पिस्तुल, रात्रीच्यावेळी मार्गदर्शक ठरणारी उपकरणांनी सुसज्ज केले जाईल. त्यामुळे भारतीय कमांडोंची मिशन यशस्वी करण्याची क्षमता अनेक पटींनी वाढेल. जून 2015 मध्ये भारतीय लष्कराच्या कमांडोंनी म्यानमारच्या सीमेत घुसून दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. 
 
सप्टेंबर 2016 मध्ये कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून उरी हल्ल्याचा बदला घेतला होता. तातडीने स्पेशल वेपन्स खरेदी करण्यासाठी अमेरिकन, इस्त्रायली आणि स्वीडीश कंपन्यांनाकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. विशेष ऑपरेशन्ससाठी हलक्या वजनाच्या युध्द गाडयाही विकत घेण्यात येणार आहेत. 
 
या गाडया हॅलिकॉप्टरनेही वाहून नेता येतील. 13 लाखाच्या भारतीय सैन्य दलामध्ये नऊ पॅरा स्पेशल फोर्सेस आणि पाच पॅरा (एअरबॉर्न) फोर्सेस आहेत. या फोर्सेसमध्ये निवडल्या जाणा-या कमांडोंना अत्यंत कठोर प्रशिक्षणातून जावे लागते. 
 

Web Title: Surgical Strike Commandos Will Be More 'Fatal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.