केरळमधील हॅकर्सचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक

By admin | Published: December 29, 2016 03:22 PM2016-12-29T15:22:54+5:302016-12-29T15:22:54+5:30

मल्याळी सायबर एक्सपर्टने पाकिस्तानी विमानतळाची बेवबसाईट हॅक करत आयडी आणि पासवर्ड फेसबूकवर सार्वजनिक केला

Surgical Strike on hackers in Pakistan | केरळमधील हॅकर्सचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक

केरळमधील हॅकर्सचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक

Next
>ऑनलाइन लोकमत
त्रिवेंद्रम, दि. 29 - बुधवारी काश्मीरी चिता नावाच्या एका पाकिस्तानी सायबर ग्रुपरने त्रिवेंद्रम विमानतळाची वेबसाईट हॅक केली होती. प्रत्युत्तरात मल्याळी सायबर एक्सपर्टने पाकिस्तानी विमानतळाची बेवबसाईट हॅक केली. मल्याळी एक्सपर्टकडून करण्यात आलेल्या या सायबर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी विमानतळाचा आयडी आणि पासवर्ड फेसबूकवर शेअर करत सार्वजनिक करुन टाकला. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मल्याळी सायबर एक्सपर्टने सियालकोट विमानतळाचा अॅडमिन लॉग इन हॅक केलं. यानंतर पासवर्ड बदलून मल्याळीज असा ठेवण्यात आला होता. पासवर्ड बदलल्यानंतर त्यांनी लगेच वेबसाईटचा स्क्रिन शॉट घेत आपल्या फेसबूक पेजवर शेअर केला. इतकंच नाही तर फेसबूकवरील आपल्या फॉलोअर्सना पासवर्ड आणि आयडी वापरत लॉग इन करण्याचं आवाहनही केलं. 
 
या पोस्टसोबत हॅकर्सने पासवर्ड बदलू नका, यामुळे इतरांनी त्यांची क्रिएटीव्हिटी दाखवण्याची संधी मिळेल अशी खिल्ली उडवली आहे. 

Web Title: Surgical Strike on hackers in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.