काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करणार - हाफिज सईद बरळला
By admin | Published: November 7, 2016 08:06 PM2016-11-07T20:06:18+5:302016-11-07T20:06:18+5:30
जमात उल दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने दहशतवाद्यांमार्फत काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची धमकी दिली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 7 - भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेपार सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांच्या वर्मावर घाव घालता होता. त्याच्या वेदना पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना अजूनही जाणवत असून, जमात उल दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने दहशतवाद्यांमार्फत काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची धमकी दिली आहे.
"नरेंद्र मोदींनी त्यांना जे काही करायचे ते केले आहे. आता पलटवार करण्याची वेळ आमची आमची आहे. आमचे दहशतवादी आता काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करतील. " अशी धमकी हाफिज सईदने पाकव्याप्त काश्मीरमधील मिरपूर येथे सभेला संबोधित करताना दिली.
"दहशतवाद्यांनी केलेली सर्जिकल स्ट्राइक भारताला दीर्घकाळ स्मरणात राहील. ही स्ट्राइक भाराताने केलेल्या आणि जगाला खबरही न लागलेल्या सर्जिकल स्ट्राइकसारखी नसेल." असेही तो बरळला. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतरही भाराताने आता पाकिस्तानच्या सैन्याकडून होणाऱ्या सर्जिकल स्ट्राइकसाठी तयार राहावे अशी धमकी दिली होती.