इस्रायलसारखेच सर्जिकल स्ट्राईक्स - मोदी
By admin | Published: October 19, 2016 05:00 AM2016-10-19T05:00:51+5:302016-10-19T05:00:51+5:30
पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्स तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलने केलेल्या धाडसी कारवायांशी करून भारत कोणाच्याही तुलनेत मागे नाही हे दाखविले.
नवी दिल्ली- पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्स तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलने केलेल्या धाडसी कारवायांशी करून भारत कोणाच्याही तुलनेत मागे नाही हे दाखविले. आमच्या लष्कराच्या शौर्याची चर्चा आज देशभर होत आहे. अशा स्वरुपाच्या कारवाया इस्रायलने केल्याचे आम्ही आतापर्यंत ऐकले होते, असे मोदी म्हणाले.
आपल्या शत्रू देशांतील नेमकी ठिकाणे आणि अतिरेकी संघटनांना लक्ष्य करण्याची इस्रायलची जगभर ख्याती आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथे तीन औष्णीक वीज प्रकल्पांचे उद््घाटन मंगळवारी मोदी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. माजी सैनिकांचा ह्यवन रँक वन पेन्शनह्णचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आमच्या सरकारने पूर्ण केले आहे, असे मोदी म्हणाले. यापूर्वीच्या सरकारांनी लोकांना मोठमोठी आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली. काही सरकारांनी तर वन रँक वन पेन्शनसाठी २०० ते ५०० कोटी रुपयेही बाजुला काढून ठेवले परंतु एकूण खर्च किती येईल व ही मागणी प्रत्यक्षात राबवायची कशी याचे विश्लेषणच केले नाही, असे त्यांनी सांगितले.
मी ते विश्लेषण केल्यावर लक्षात आले की आर्थिक बोजा वाढत जाणारा आहे. १० हजार कोटी रुपयांपेक्षाही हा बोजा जास्त असल्याचे दिसले. कोणत्याही सरकारला एकाच वेळी ऐवढी तरतूद करून ठेवणे अवघडच आहे.