आश्चर्य ! "या" गावात सर्वांचाच जन्म 1 जानेवारीचा
By admin | Published: May 20, 2017 11:14 AM2017-05-20T11:14:50+5:302017-05-20T11:26:16+5:30
अलाहाबादमध्ये असलेल्या या गावात प्रत्येकाचीच जन्मतारीख 1 जानेवारी आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
अलाहाबाद, दि. 20 - एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 1 जानेवारी असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. पण जर त्याचे आई, वडिल, भावंडं इतकंच नाही तर संपुर्ण खानदानाची जन्मतारीख 1 जानेवारी असेल तर...ऐकतानाचा चित्रिविचित्र वाटत असलेल्या या गोष्टीवर विश्वास ठेवणं शक्य तरी आहे का ? पण विश्वास बसत नसला तरी उत्तरप्रदेशातील गावात मात्र असं घडलं आहे. अलाहाबादमध्ये असलेल्या या गावात प्रत्येकाचीच जन्मतारीख 1 जानेवारी आहे.
अलाबादमधील गुरपूर ब्लॉक येथील कजंसा गावातील ही परिस्थिती आहे. या गावातील प्रत्येकाचीच जन्मतारीख 1 जानेवारी असून आधार कार्डवर तशी नोंदच आहे.
10 हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला आधार कार्डसाठी खूप वाट पाहावी लागली. ही घोडचूक तेव्हा लक्षात आली जेव्हा सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंद करण्यासाठी गावात पोहोचले. उत्तर प्रदेश सरकारने शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या माहिती करुन घेण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक नोंद करण्याचा आदेश दिला आहे. कोणत्याही घरात गेले असता प्रत्येकाची जन्मतारीख एकच असल्याचं पाहून ही चूक शिक्षकांच्या लक्षात आली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं.
चूक लक्षात आल्यानंतर गावक-यांना पुन्हा नव्याने आधार कार्ड देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.