अहो आश्चर्यम...गोदामांत काहीही न करता वाढला १०.५ लाख टन गहू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 06:37 AM2022-03-31T06:37:02+5:302022-03-31T06:37:35+5:30

पंजाब, हरियाणा, यूपीमध्ये सर्वाधिक वाढ, महाराष्ट्रात झाला कमी

Surprisingly ... 10.5 lakh tonnes of wheat was grown in the godown without doing anything | अहो आश्चर्यम...गोदामांत काहीही न करता वाढला १०.५ लाख टन गहू

अहो आश्चर्यम...गोदामांत काहीही न करता वाढला १०.५ लाख टन गहू

Next

नितीन अग्रवाल
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गोदामांमध्ये चोरी व अन्नधान्याचे नुकसान होणे ही बाब आता जुनी झाली आहे. आता गोदामांत गव्हाची शेती झाल्यासारखे वाटत आहे. कारण सरकारी आकडेवारीनुसार, ७,७०९ टन गव्हाच्या नुकसानीशिवाय या गोदामांत गहू १०.५ लाख टनांनी वाढला आहे. यातील सर्वाधिक गहू पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थानच्या गोदामात वाढला आहे.

अन्न व पुरवठा मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मागील पाच वर्षांत देशभरातील गोदामांमध्ये गव्हाची १०,४९,७०० लाख टनांनी वाढ झाली. यातील सर्वाधिक ४.०९ लाख टनाची वाढ पंजाब व ३.०६ लाख टनाची वाढ हरियाणात झाली. महाराष्ट्रासह ६ राज्यांच्या गोदामांतील गहू कमीही झाला आहे. यात सर्वाधिक ७,१५५ टन गहू महाराष्ट्रात, २४८ टन गहू ओडिशात, २२२ टन गहू दिल्लीत  गोदामांतून कमी झाला. 

राज्य          वाढलेला गहू
पंजाब        ४,०९,३३०
हरियाणा        ३,०६,१२०
मध्य प्रदेश    १,५१,२२८
उत्तर प्रदेश    १,०५,५६४
राजस्थान     ६०,१५०
गुजरात    ९,४१२

राज्य         वाढलेला गहू
केरळ    ४,६८६
पश्चिम बंगाल    ४,३४१
तामिळनाडू        १,८८४
महाराष्ट्र (कमी)      ७१५५
अखिल भारतीय     १०,४९,७००
सर्व आकडेवारी टनमध्ये

Web Title: Surprisingly ... 10.5 lakh tonnes of wheat was grown in the godown without doing anything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Punjabपंजाब