पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरावर पाळत?; ड्रोन उडविणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 09:28 AM2023-07-04T09:28:41+5:302023-07-04T09:28:55+5:30

दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानावर ड्रोनसारखी वस्तू उडत आहे.

Surveillance at Prime Minister Narendra Modi's house?; Police are searching for the person flying the drone | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरावर पाळत?; ड्रोन उडविणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरावर पाळत?; ड्रोन उडविणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु

googlenewsNext

नवी दिल्ली : लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर पहाटे साडेपाच वाजता ड्रोन दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ‘उड्डाणरहित’ क्षेत्रात ड्रोन उडविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला. परंतु, तपासात अशी कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही.

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी पोलिस नियंत्रण कक्षात कॉल आला की, दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानावर ड्रोनसारखी वस्तू उडत आहे. मात्र, पोलिसांनी तपास केला असता, काहीही निष्पन्न झाले नाही. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हवाई वाहतूक नियंत्रकांनाही काहीही सापडले नाही. पोलिसांनी म्हटले की, ‘पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ एक अज्ञात वस्तू उडत असल्याची माहिती मिळाली होती. आजूबाजूच्या परिसरात कसून शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, अशी कोणतीही वस्तू आढळून आली नाही.’

Web Title: Surveillance at Prime Minister Narendra Modi's house?; Police are searching for the person flying the drone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.