बहुळातून आवर्तन सोडण्याची मागणी ५ रोजी पाहणी : सतीश पाटील यांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

By admin | Published: February 4, 2016 12:06 AM2016-02-04T00:06:47+5:302016-02-04T00:06:47+5:30

जळगाव : एरंडोल तालुक्यातील कासोदासह १६ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे बहुळा धरणाचे पाणी दहिगाव बंधार्‍यात सोडण्यात यावे या मागणीसाठी पारोळ्याचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची बुधवारी संध्याकाळी ५ वाजता भेट घेतली. यासाठी शुक्रवार५ रोजी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी संयुक्त पाहणी करणार आहेत.

Survey on 5th for release of Cycle from Panchal: Satish Patil visited District Collector | बहुळातून आवर्तन सोडण्याची मागणी ५ रोजी पाहणी : सतीश पाटील यांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

बहुळातून आवर्तन सोडण्याची मागणी ५ रोजी पाहणी : सतीश पाटील यांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

Next
गाव : एरंडोल तालुक्यातील कासोदासह १६ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे बहुळा धरणाचे पाणी दहिगाव बंधार्‍यात सोडण्यात यावे या मागणीसाठी पारोळ्याचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची बुधवारी संध्याकाळी ५ वाजता भेट घेतली. यासाठी शुक्रवार५ रोजी जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी संयुक्त पाहणी करणार आहेत.
याबाबत पत्रकारांना माहिती देतांना आमदार डॉ.सतीश पाटील म्हणाले की, जिल्हा प्रशासनातर्फे काही महिन्यांपूर्वी गिरणा धरणावरून आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र हे पाणी दहिगाव बंधार्‍यापर्यंत पोहचले नव्हते. या दरम्यान दहिगाव बंधार्‍याजवळ पंपींग करून पाणी उचलण्यात आले होते. यामुळे किमान दोन महिने १६ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. १६ गावांसाठी बहुळा धरणावरून ७० टीएमसी पाणी राखीव करण्यात आले होते. सद्यस्थितीला या गावांमध्ये टंचाईची स्थिती जाणवत असल्यामुळे बहुळा धरणावरून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. दरम्यान, उत्राणजवळ बंधार्‍याचे बांधकाम केल्यामुळे बहुळाचे पाणी येणासाठी अडचण येणार आहे. त्यासाठी ५ रोजी जिल्हाधिकारी व संबधित विभागाचे कार्यकारी अभियंता हे प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

प्रसिद्धीसाठी पाकिट देण्याची आवश्यकता भासली नाही
चांगल्या कामाला प्रसिद्धी मिळत नसल्याने वृत्तपत्रांना पाकिटे द्यावे लागत असल्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपूर्वी विधान केले होते. मात्र राजकारणात काम करीत असताना आपल्याला कधी पाकिटे देण्याची आवश्यकता भासली नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: Survey on 5th for release of Cycle from Panchal: Satish Patil visited District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.