उपकरप्राप्त इमारतींचा सर्व्हे २३ फेब्रुवारीपासून
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:03+5:302015-02-14T23:51:03+5:30
उपकरप्राप्त इमारतींचा सर्व्हे २३ फेब्रुवारीपासून
Next
उ करप्राप्त इमारतींचा सर्व्हे २३ फेब्रुवारीपासूनधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे होणार स्थलांतरमुंबई :दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरांतील मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण म्हाडा लवकरच हाती घेणार आहे. २३ फेब्रुवारी ते १५ मार्चपर्यंत म्हाडा हे सर्वेक्षण करणार असून धोकादायक इमारतींतील रहिवाशांना तात्काळ स्थलांतरीत करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.शहरात म्हाडाच्या जुन्या व मोडकळीस आलेल्या हजारो उपकरप्राप्त इमारती आहेत. पावळ्यापुर्वी या इमारतींचा सर्व्हे म्हाडा करते. या सर्व्हेनंतर एप्रिल महिना अखेर म्हाडाकडून धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. यानंतर अतिधोकादायक ठरविण्यात आलेल्या इमारतीमधील रहिवाशांना तात्काळ स्थलांतरीत करण्यासाठी नोटिसा देण्यात येतात. गतवर्षी म्हाडाने ८ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्या होत्या.या वर्षी २३ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान या इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून रहिवाशांना स्थलांतरीत करण्यासाठी म्हाडा अधिकार्यांना बराच वेळ मिळणार आहे. परंतू उपकरप्राप्त इमारतीमधून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आल्यानंतर त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्यासाठी कित्येक वर्षे जातात. यापुर्वी संक्रमण शिबिरांमध्ये पाठविण्यात आलेले रहिवाशी अद्यापही संक्रमण शिबिरामध्ये खितपत पडले आहेत. इमारतीचा पुर्नविकास वेळेत होत नसल्याने आणि रहिवाशांना उपनगरात पाठविण्यात येत असल्याने बरेच रहिवाशी याला विरोध दर्शवितात. त्यामुळे धोकादायक इमारतीमधील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. सर्वेक्षणादरम्यान डागडुजी आवश्यक असलेल्या इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यामुळे उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.