आता मनपाकडून सर्वेक्षण फुले मार्केट: सहा पथकांव्दारे आजपासून कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2016 12:32 AM2016-04-28T00:32:01+5:302016-04-28T00:32:01+5:30
जळगाव : सेंट्रल फुले मार्केटचे महसूल विभागाकडून सर्वेक्षण सुरू झाले असतानाच महापालिकेकडूनही हे सर्वेक्षण करावे असे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले असून त्यानुसार गुरुवारी महाापालिकेच्या सहा पथकांव्दारे हे काम करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Next
ज गाव : सेंट्रल फुले मार्केटचे महसूल विभागाकडून सर्वेक्षण सुरू झाले असतानाच महापालिकेकडूनही हे सर्वेक्षण करावे असे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले असून त्यानुसार गुरुवारी महाापालिकेच्या सहा पथकांव्दारे हे काम करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सेंट्रल फुले मार्केटमधील गाळे लीजवर देण्याची मागणी व्यापार्यांनी फेडरेशन स्थापन करून महसूल विभागाकडे केली आहे. त्याची दखल घेत महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी जिल्हाधिकार्यांकडून तीन दिवसात अहवाल मागविला आहे. महसूल विभागाने ७ पथकांची नियुक्ती करून मार्केटचे सर्वेक्षण केले. ७८१ गाळे धारकांकडून घेतली माहितीमहसूल विभागाने सुरू केलेल्या सर्वेक्षणात मंगळवार व बुधवार असे दोन दिवस व्यापार्यांकडील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या दोन दिवसात ९१८ पैकी ७८१ गाळेधारकांकडून माहिती घेण्यात आली. गुरुवारी दुपारी १२ पर्यंत हे कामकाज पूर्ण करून सायंकाळपर्यंत जिल्हाधिकार्यांना अहवाल देण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. बरेच गाळे बंद असल्यामुळे कामकाजात काहीसा अडथळा येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. आयुक्तांनाही आदेशमहसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी दिलेल्या आदेशांची जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनाही माहिती दिली असून त्यांनीही महापालिकेडून स्वतंत्र सर्वेक्षण करावे अशा सूचना दिल्या आहेत. गुरुवारपासून मनपाचे सर्वेक्षणजिल्हाधिकार्यांच्या या आदेशानुसार महापालिकेकडून सेंट्रल फुले मार्केटमधील गाळ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी विविध प्रभागी समिती कार्यालयांमधील कर्मचार्यांचा समावेश असलेली सहा पथके तयार करण्यात येणार आहेत. दोन दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दोन दिवसात या संदर्भातील अहवाल सादर केला जाईल. -संजय कापडणीस, आयुक्त मनपा