Varanasi: वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला सुरुवात, प्रचंड तणाव, जोरदार घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 04:37 PM2022-05-06T16:37:16+5:302022-05-06T16:38:56+5:30
Survey of Gyanvapi Masjid: वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरामध्ये सर्वेच्या कारवाईसाठी कोर्ट कमिश्नरसह हिंदू आणि मुस्लिम पक्षाचे वादी आणि वकील पोहोचले आहेत. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, दोन्ही पक्षांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
वाराणसी - वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरामध्ये सर्वेच्या कारवाईसाठी कोर्ट कमिश्नरसह हिंदू आणि मुस्लिम पक्षाचे वादी आणि वकील पोहोचले आहेत. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, दोन्ही पक्षांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. काशी विश्वनाथ मंदिराबाहेर असलेल्या एका गटाने सांगितले की, आधी हर हर महादेवच्या घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे आम्ही किती वेळ गप्प राहू शकलो असतो.
वाराणसीमध्ये आज काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या परिसरामध्ये व्हिडीओग्राफी होणार आहे. वाराणसीमधील एका न्यायालयाने परिसरातील श्रृंगार गौरी आणि इतर काही विग्रहांचं सर्व्हे आणि व्हिडीओग्राफी करण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये कोर्टाकडून नियुक्त करण्यात आलेले वकील कमिश्नर सर्वे करणाता आहेत. ते माँ श्रृंगार गौरी आणि अन्य विग्रह तसेच इतर देवतांची स्थिती काय आहे, त्याची पाहणी करणार आहेत. या सर्व्हेमध्ये कुठल्याही प्रकारची मोजणी होणार नाही. मात्र मंदिर आणि विग्रह कुठे कुठे आहेत, त्याचा शोध घेतला जाणार आहे.
श्रृंगार गौरी आणि इतर विग्रह तसेच देवी देवतांच्या स्थानाचे सर्वेक्षण होणार हे गुरुवारी निश्चित झाले होते. कोर्टाकडून वकील कमिश्नर म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अजय कुमार मिश्र यांनी स्वत:च्या आणि इतरांच्या तसेच सर्वे करण्यात आलेल्या वस्तूंच्या संरक्षणाची विनंती केली होती. त्यानंतर कोर्टाने सुरक्षेची जबाबदारी वाराणसी पोलीस कमिश्नरेटला दिली आहे.
दरम्यान, ज्ञानवापी मशिदीची संस्था अंजुमन इंतजामिया मशीदीच्या वकिलांनी सांगितले की, या सर्व्हेमध्ये ज्य श्रृंगार गौरी मंदिराचा उल्लेख केला जात आहे, ते मंदिर आके कुठे, मशिदीच्या परिसरात असे कुठलेही मंदिर किंवा विग्रह उपस्थित नाही आहे.