Survey : चार सदस्य असलेल्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती असायला हवे? लोकांनी दिली अशी उत्तरं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 08:20 PM2022-01-31T20:20:05+5:302022-01-31T20:22:04+5:30
सी व्होटरच्या माध्यमाने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणानुसार, लोकांना प्रश्न करण्यात आला की, जर चार सदस्यांचे कुटुंब असेल, तर त्याचे मासिक उत्पन्न किती असायला हवे? या प्रश्नासाठी अनेक पर्याय देण्यात आले होते.
पाच राज्यांत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना महामारीशी झुंज देत असलेल्या देशाला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. या काळात मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग आणि निम्न स्तरांतील लोकांना गंभीर आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. मात्र, हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजने सी व्होटरच्या माध्यमाने बजेटशी संबंधित एक विशेष सर्वेक्षण केले आहे.
सी व्होटरच्या माध्यमाने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणानुसार, लोकांना प्रश्न करण्यात आला की, जर चार सदस्यांचे कुटुंब असेल, तर त्याचे मासिक उत्पन्न किती असायला हवे? या प्रश्नासाठी अनेक पर्याय देण्यात आले होते. यावर, 29 टक्के लोकांनी सांगितले की, चार लोकांच्या कुटुंबासाठी दरमहा 20 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असायला हवे. 15 टक्के लोकांनी सांगितले, की 20 ते 30 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असायला हवे. तसेच 30-40 हजारपर्यंत उत्पन्न असावे, असे 17 टक्के लोकांनी म्हटले आहे.
याशिवाय, 7 टक्के लोक असेही आढळून आले की, एवढ्या मोठ्या कुटुंबासाठी 40-50 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असावे, तर 21 टक्के लोकांनी 50 हजार ते 1 लाख रुपये उत्पन्न असावे, असे सांगितले. याशिवाय एवढ्या मोठ्या कुटुंबाचे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा अधिक असावे, असे मानणारेही 11 टक्के लोक समोर आले आहेत.
4 सदस्यांच्या कुटुंबासाठी मासिक उत्पन्न किती असायला हवे?
Cvoter सर्व्हे -
20 हजार पर्यंत - 29%
20-30 हजार पर्यंत - 15%
30-40 हजार पर्यंत - 17 %
40-50 हजार पर्यंत - 7%
50 हजार ते 1 लाख पर्यंत - 21%
1 लाखपेक्षा अधिक - 11%