‘टपाल’चे स्वरूप बदलण्यासाठी सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 05:02 AM2018-02-22T05:02:55+5:302018-02-22T05:03:25+5:30
आॅनलाइन सेवांचा वाढता विस्तार व पत्रव्यवहाराचे घटलेले प्रमाण पाहून, टपाल कार्यालयांची उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी विभागाने जनतेकडून मते मागवण्याचे ठरवले आहे.
संतोष ठाकूर
नवी दिल्ली : आॅनलाइन सेवांचा वाढता विस्तार व पत्रव्यवहाराचे घटलेले प्रमाण पाहून, टपाल कार्यालयांची उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी विभागाने जनतेकडून मते मागवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी आॅनलाइन सर्व्हे सुरू झाला आहे. त्यात सामान्यांनी टपाल खात्याच्या वेगवेगळ््या सेवांबद्दलच नव्हे, तर टपाल कार्यालयांचे स्वरूप कसे असावे याविषयीही सूचना करू शकतील. त्याद्वारे कोणत्या सेवा दिल्या जाव्यात व कोणत्या लाभदायक ठरतील यासाठी काय पावले उचलणे शक्य होईल.
टपाल विभागाचे प्रवक्ते शंभुनाथ चौधरी म्हणाले की,
सामान्य लोक १५ मे, २०१८ पर्यंत टपाल विभागाचे संकेतस्थळ इंडिया पोस्टवर जाऊन सूचना करू
शकतील. लोकांना टपाल विभागाशी जोडणे व त्यांची महत्त्वाची मते
व सूचना मिळवणे, असा याचा
हेतू आहे.
वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की ज्या सेवा टपाल विभागात
आज नाहीत परंतु वेगवेगळ््या क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या आहेत त्या समजून घेणे, हाही एक हेतू सर्व्हेचा आहे. टपाल विभागात बसच्या तिकिटाचे बुकिंग सुरू करावे, अशीही सूचना आली आहे. अनेक राज्यांत बस तिकिटाचे बुकिंग आॅनलाइन होते, पण तेथील अनेक लोक
इंटरनेट सेवेशी परिचित नाहीत. ते टपाल कार्यालयात बसचे तिकीट बुक करू शकतील.