Video: धावत्या हत्तीपासून वाचला, महिंद्रांनी शेअर केला जगातील सर्वात बेस्ट ड्रायव्हरचा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 09:19 PM2022-09-12T21:19:51+5:302022-09-12T21:27:17+5:30
तो कारचालक बोलेरो गाडी चालवत असल्याचं महिंद्रा यांनी ट्विट करुन सांगितलंय. तसेच, हा व्हिडिओही त्यांनी सर्वांसाठी शेअर केला आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन नेहमीच चांगले चांगले व्हिडिओ शेअर करत असतात. त्यातच नवनवीन गाड्या किंवा भन्नाट जुगाड करणाऱ्यांचेही व्हिडिओ ते शेअर करतात. नुकतेच, अनंत चतुर्दशी पार पडली, असून आनंद महिंद्रा यांनी गणपती बाप्पाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. अतिशय जड अंत:करणाने आपण सगळे बाप्पाचे विसर्जन करतो आणि त्याला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करतो. महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्य़ा व्हिडिओमध्येही याविषयीच भाष्य केले होते. आता, त्यांनी जंगलात बोलेरो कारवर धावून गेलेल्या हत्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत जंगलात हत्ती कारवर धावून जात असताना दिसून येते. या बलाढ्य हत्तीपासून स्वत:चा आणि कारचा बचाव करताना कारचालक तुफान वेगात गाडी रिव्हर्समध्ये चालवत आहे. विशेष म्हणजे समोर येणाऱ्या हत्तीकडे पाहात तो वेगाने गाडी पाठीमागे घेत आहे. अखेर हत्ती गाडीचा पाठलाग सोडून देतो आणि कारमधील दोघांचा जीव भांड्यात पडतो. तो कारचालक बोलेरो गाडी चालवत असल्याचं महिंद्रा यांनी ट्विट करुन सांगितलंय. तसेच, हा व्हिडिओही त्यांनी सर्वांसाठी शेअर केला आहे.
This was apparently at the Kabini Reserve last Thursday. I hereby anoint the man at the wheel as the best Bolero driver in the world & also nickname him Captain Cool. pic.twitter.com/WMb4PPvkFF
— anand mahindra (@anandmahindra) September 12, 2022
कबिनी रिझर्व्हमधील हा व्हिडिओ असून महिंद्रांनी या कारचालकास जगातील सर्वात उत्तम बोलेरो कारचालक असं म्हटलं आहे. तसेच, कॅप्टन कूल असं टोपणनावही त्यांनी देऊ केलं आहे. आता, हे बोलेरो कारचालक आर्मीमॅन लेफ्टनंतर मिस्टर प्रकाश असल्याची माहिती समोर आली आहे.
👍🏽👍🏽👍🏽👏🏽👏🏽👏🏽 https://t.co/Ii9AkHePTy
— anand mahindra (@anandmahindra) September 12, 2022
विसर्जनाअगोदरही केला होता व्हिडिओ शेअर
महिंद्रांनी गणेशोत्सवात असाच एक व्हिडिओ शेअर केला होता, जो पाहून गणेश भक्तांना खूप आनंद झाला. त्या व्हिडिओमध्ये हत्तीचे एक छोटे पिल्लू दिसत आहे. हे पिल्लू अतिशय जोरजोरात आपली इवलीशी सोंड हलवताना दिसत आहे. यामागे बाप्पा आपल्याला सोंडेने अलविदा करत असल्याचा भाव असल्याचे महिंद्रा यांनी म्हटले आहे. आपल्या या पोस्टला कॅप्शन देताना महिंद्रा म्हणतात, बाप्पा आपल्या सोंडेने गुडबाय करतोय, आणि आपण त्याला म्हणतो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! सी यू नेक्स्ट इयर. या व्हिडिओमध्ये पिल्लू हत्तीच्या समोर एक मोठा हत्ती उभा असल्याचे दिसते. याबरोबरच या हत्तींच्या बाजूला बगळे आणि छान हिरवेगार गवत असल्याचेही दिसते.