सूर्यग्रहणावेळी 'या' गोष्टी चुकूनही करू नका !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 10:01 PM2018-02-14T22:01:02+5:302018-02-15T10:43:41+5:30

ग्रहणासंदर्भात भारतात अनेक समज-गैरसमज आहेत. असं म्हणतात, ग्रहण लागले म्हणजे सूतक सुरू होते, अशीही काहींची धारणा आहे.

Surya Grahan 2018: Do not mistake these 'things' during the solar eclipse! | सूर्यग्रहणावेळी 'या' गोष्टी चुकूनही करू नका !

सूर्यग्रहणावेळी 'या' गोष्टी चुकूनही करू नका !

Next

नवी दिल्ली- ग्रहणासंदर्भात भारतात अनेक समज-गैरसमज आहेत. ग्रहण लागले म्हणजे सूतक सुरू होते, अशीही काहींची धारणा आहे. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण या नैसर्गिक प्रक्रिया असून, त्या सृष्टीच्या नियमानुसारच घडत असतात. 2018 वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 15 फेब्रुवारीला लागणार असून, हे ग्रहण भारतात दिसणार नाही. परंतु हे ग्रहण दक्षिण अमेरिकेतल्या उरुग्वे आणि ब्राझील सारख्या देशांत दिसणार आहे. इतकंच नव्हे, तर ज्योतिषशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2018लाही सूर्यग्रहण होणार आहे. मात्र हे सूर्यग्रहणही भारतात दिसणार नाही. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात, त्यालाच सूर्यग्रहण असे संबोधले जाते. ग्रहणाला 15 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजून 25 मिनिटांनी सुरुवात होणार असून, ते 16 फेब्रुवारीच्या पहाटे 4.18 वाजेपर्यंत राहणार आहे. सूर्यग्रहण पाहण्यासाठी वैज्ञानिकांनी प्रमाणित केलेल्या टेलिस्टकोपचा वापर केला पाहिजे. सूर्यग्रहण पाहण्यासाठी टेलिस्टकोपसारख्या चष्म्याचा वापर करावा, ज्यात अल्ट्रावॉयलेट किरणं रोखण्याची शक्ती आहे.

सूर्यग्रहणाच्या वेळी हे नक्की करा !
- सूर्यग्रहणानंतर गंगा, यमुना, गोदावरीसारख्या पवित्र नद्या आणि सरोवरांमध्ये स्नान करून देव-देवतांची आराधना केली पाहिजे.
- पवित्र नद्यांमध्ये आंघोळ केल्यानंतर गरीब आणि ब्राह्मणांना दान द्यावे, त्यामुळे ग्रहणाचा प्रभाव काहीसा कमी होतो, असा समज आहे. 
- ग्रहण पाहण्याचा प्रयत्न करू नये. देवाचा जप- ध्यान करावे.
- सूर्यग्रहणच्या पूर्वी सूतक असल्यास शिजवलेल्या जेवणात तुळशीची पानं टाकावीत.

सूर्यग्रहणावेळी हे करू नका!
- हिंदू पुराणानुसार, सूर्यग्रहणाच्या आधी चार प्रहरांपर्यंत जेवण करू नका. ग्रहणाच्या दरम्यान वयस्क, मुलं आणि रुग्ण एका प्रहारापूर्वी जेऊ शकतात. सूर्यग्रहणादिवशी झाडाची पानं, लाकूड, फुलं तोडू नये.  
- गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण पाहू नये. ग्रहण पाहिल्यास पोटातील बाळावर त्याचे दुष्परिणाम होतात, अशी आख्यायिका सांगितली जाते. सूर्यग्रहण आणि सुतकात महिलांनी घराबाहेर पडू नये.
- सूर्यग्रहणाच्या वेळी केस कापू नये आणि कपडेही पिळू नयेत. त्याप्रमाणे दातही घासू नयेत. ग्रहणाच्या वेळी कुलूप उघडणं, सोनं, मल-मूत्र विसर्जित करणं, जेवण करण्यासारख्या गोष्टी वर्जित कराव्यात. 
- सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाच्या दरम्यान कोणतंही शुभ कार्य करू नये. यादरम्यान शुभ कार्य केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसत नाहीत.

Web Title: Surya Grahan 2018: Do not mistake these 'things' during the solar eclipse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.