'मुँह में राम, जेब में चंदा, चम्पत होगा अब ये बंदा।', राम मंदिर ट्रस्टमधील कथित घोटाळ्याबाबत माजी IAS अधिकाऱ्याचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 11:41 AM2021-06-14T11:41:15+5:302021-06-14T11:49:27+5:30

ram mandir trust : सूर्य प्रताप सिंह अनेकदा केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या धोरणांवर टीका करताना दिसतात.

surya pratap singh ias slam ram mandir ayodhya ram mandir trust scam donation in rams pocket this man fired soon former iass taunt on the scam in ram mandir trust said lost the trust | 'मुँह में राम, जेब में चंदा, चम्पत होगा अब ये बंदा।', राम मंदिर ट्रस्टमधील कथित घोटाळ्याबाबत माजी IAS अधिकाऱ्याचा टोला

'मुँह में राम, जेब में चंदा, चम्पत होगा अब ये बंदा।', राम मंदिर ट्रस्टमधील कथित घोटाळ्याबाबत माजी IAS अधिकाऱ्याचा टोला

Next

नवी दिल्ली : माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी राम मंदिरासाठी जमीन खरेदी प्रकरणातील कथित घोटाळ्याबाबत जोरदार टीका केली आहे. त्यांनी एकामागून एक ट्विट केले असून म्हटले आहे की, "भगवान श्री राम यांच्या नावावर कोट्यवधींचा घोटाळा चिंताजनक आहे, राम हे समाजातील सर्वात खालच्या स्तरावर उभे असलेल्या व्यक्तीच्या तारणकर्त्याचे नाव आहे. ट्रस्टचे एक विश्वस्त डीएम अयोध्या आणि इतर दोन आयएएस आहेत. ट्रस्टच्या सरचिटणीसकडील आर्थिक अधिकार जप्त करून, सर्व आर्थिक अधिकार दोन जबाबदार लोकांना एकत्रितपणे देण्यात यावेत." (surya pratap singh ias slam ram mandir ayodhya ram mandir trust scam donation in rams pocket this man fired soon former iass taunt on the scam in ram mandir trust said lost the trust)

याचबरोबर, सूर्य प्रताप सिंह म्हणाले, रामजन्मभूमीला मिळालेला 1-1 रुपया राम भक्तांचाच आहे, जे त्यांच्या रामाबद्दलच्या अटूट भक्तीचे प्रतीक आहेत. माझा केंद्र सरकारला असा सल्ला आहे की, या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून ट्रस्टशी संबंधित सर्व आर्थिक अधिकार यंत्रणेशी संबंधित जबाबदार लोकांना मिळेल, जे रामभक्तांना पूर्णपणे उत्तरदायी असतील. या माजी आयएएस अधिकाऱ्यांने आणखी एक टोला लगावत ट्वीट केले आहे. यामध्ये लिहिले की, ‘मुँह में राम, जेब में चंदा, चम्पत होगा अब ये बंदा।’ तसेच, पुढे म्हणाले, 'ट्रस्टने लाखो रामभक्तांचा विश्वास गमावला.'

दरम्यान, सूर्य प्रताप सिंह अनेकदा केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या धोरणांवर टीका करताना दिसतात. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत उन्नावमधील गंगेमध्ये मृतदेह सोडण्याचा मुद्दा प्रमुखपणे उपस्थित केला होता. याप्रकरणी, यूपी पोलिसांनीही त्याच्याविरूद्ध एफआयआर नोंदविला होता आणि चौकशीसाठी बोलविले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
राम मंदिर ट्रस्टवर मंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळ्याचा आरोप केला आहे. आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन असा आरोप केला की,  जी जमीन केवळ 2 कोटी रुपयांना विकली गेली होती, ती जमीन 18.5 कोटीमध्ये विकत घेतले गेली. दुसरीकडे, राम मंदिर ट्रस्टचे सेक्रेटरी चंपत राय यांनी म्हटले आहे की, या आरोपांमुळे कोणतीही चिंता वाटत नाही. ते म्हणाले की, आमच्यावर महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोपही करण्यात आला होता. आम्हाला अशा गोष्टींची पर्वा नाही.

Web Title: surya pratap singh ias slam ram mandir ayodhya ram mandir trust scam donation in rams pocket this man fired soon former iass taunt on the scam in ram mandir trust said lost the trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.