Sushant Singh Rajput Case: मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMCने जबरदस्तीने केलं क्वारंटाईन, बिहार पोलिसांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 08:45 AM2020-08-03T08:45:00+5:302020-08-03T11:40:32+5:30
Sushant Singh Rajput Case: सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस वेगाने तपास करत आहेत. याच दरम्यान आता सुशांत आत्महत्येप्रकरणी मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMC ने केलं क्वारंटाईन केल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई - छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या आत्महत्ये मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र काहींनी सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस वेगाने तपास करत आहेत. मात्र काहींनी यावरही प्रश्नचिन्ह निर्माण करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. याच दरम्यान आता सुशांत आत्महत्येप्रकरणी मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMC ने केलं क्वारंटाईन केल्याची घटना समोर आली आहे.
सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता बिहार पोलीस देखील मुंबईत दाखल झाले आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी मुंबईत आलेले आयपीएस अधिकारी आणि बिहार शहर पूर्वचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईन केलं आहे. बिहार पोलिसांनी तिवारी यांना जबरदस्तीने क्वारंटाईन केल्याचा आरोप केला आहे.
IPS officer Binay Tiwari (in pictures) who reached Mumbai from Patna on official duty to lead the police team has been forcibly quarantined by Brihanmumbai Municipal Corporation (BMC) officials: Bihar Police #SushantSinghRajputDeathCasepic.twitter.com/oIhCPy5aDu
— ANI (@ANI) August 2, 2020
बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधी एक ट्विट केलं आहे. "आयपीएस अधिकारी विनय तिवारी पोलीस टीमचं नेतृत्त्व करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत पोहोचले. मात्र त्यांना बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने क्वारंटाईन केलं आहे. विनंती करून देखील त्यांची आयपीएस मेसमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली नाही आणि आता त्यांना गोरेगावमधील एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं आहे" असं ट्विट गुप्तेश्वर पांडे यांनी केलं आहे.
IPS officer Binay Tiwari reached Mumbai today from patna on official duty to lead the police team there but he has been forcibly quarantined by BMC officials at 11pm today.He was not provided accommodation in the IPSMess despite request and was staying in a guest house in Goregaw pic.twitter.com/JUPFRpqiGE
— IPS Gupteshwar Pandey (@ips_gupteshwar) August 2, 2020
बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांकडून हवं तसं सहकार्य मिळत नसल्याची टीका अनेकांनी केली होती. तसेच मुंबई पोलीस मदत करत नसल्याचं म्हटलं जात आहे. बिहारच्या पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी हे वृत्त फेटाळून लावलं होतं. मुंबई पोलिसांनी आपल्या टीमसोबत कोणतही गैरवर्तन केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. "मुंबई पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केलं नसल्याच मुंबईतील टीमने आम्हाला कळवलं आहे. मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांच्या टीमशी गैरवर्तन करण्याच्या सर्व रिपोर्टचा मी निषेध करतो" असं बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर आता मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMCने जबरदस्तीने क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहार पोलिसांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात 9,509 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 4 लाखांवर
CoronaVirus News : तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोरोनाची लागण
CoronaVirus News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह
टिक टाॅकची 'टिकटिक' किती देशांत?; जाणून घ्या चायनीज अॅपबद्दल बरंच काही...
Video - ...म्हणून गर्भवतीला टोपलीत बसवून नदी पार करत पोहचवलं रुग्णालयात
"राम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींचं कोणतंही योगदान नाही तर..." भाजपा खासदाराचा घरचा आहेर